agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

Onion Tomato Rate : कर्नाटक आणि इतर जिल्ह्यातून बाजारसमितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. देशी वाटाण्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला असून रताळ्याची आवकही चांगली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetable Market : कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याने बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठी होत आहे. याचबरोबर वांग्याचे उत्पादन वाढल्याने दर कमी झाले आहेत. तसेच टोमॅटोचीही लाली उतरत असून दरात कमालीची घट झाली आहे. यामुळे वांगी आणि टोमॅटो उत्पादकांच्या उत्पादनात वाढ झाली परंतु दर कमी मिळाल्याने काहीसा फटका बसत आहे. कर्नाटक आणि इतर जिल्ह्यातून बाजारसमितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. देशी वाटाण्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला असून रताळ्याची आवकही चांगली आहे.

परदेशी बाजाराचा परिणाम खाद्यतेलावर होत असल्याने दरात घसरण होत आहे. धान्य बाजारात मागणी थंडावल्याने हरभरा डाळ व हरभऱ्याचे भाव कमी झाले आहेत. प्रतिकिलो ४ ते ५ रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराई व मुहूर्तामुळे फूलबाजार पुन्हा तेजीत आला आहे. पॉलिहाऊस गुलाबाला चांगलाच भाव चढला आहे. किरकोळ बाजारात गुलाबाच्या प्रतिनग दरात दुपटीने वाढ झाली आहे.

भाजीपाला किलो दर रूपयांत

टोमॅटो- २० ते २५, दोडका-५० ते ६०, वांगी -६० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ६० ते ८०, कोबी- ४० ते ५०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ३० ते ४०, जुना - ६० ते ७०, लसूण- ३८० ते ४००, आले - १२० ते १६०, लिंबू - २०० ते ५०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ८० ते १००, गवार - १०० ते १४०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ४० ते ५०, भाज्या - १० ते १५, मेथी २० ते २५ पेंडी, शेवगा - १० ते १२ रूपये.

फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - १८० ते २००, गुलाब - ३२० ते ३५०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १२० ते १५०, आष्टर - १२० ते १५०.

फळे : सफरचंद - २२० ते ४००, संत्री - ७० ते ८०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- २०० ते ३००, चिकू- १०० ते १२०, पेरू - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १०० ते १२० डझन, किवी - १६०, ड्रॅगन- १५० ते २००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - १४२ ते १४७, शेंगतेल - १९० ते १९५, सोयाबीन - १३८ ते १४४, पामतेल - १३८ ते १४२, सूर्यफूल - १४० ते १४५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३५ ते ४४, हरभराडाळ - ८६ ते ९०, तूरडाळ- १५० ते १६०, मूगडाळ -१०७ ते ११३, मसूरडाळ - ७७ ते ७८, उडीदडाळ - १२० ते १२५, हरभरा- ७८, मूग- ९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसुर- ७० ते ७२, फुटाणाडाळ - १०५ ते ११०, चवळी- ९० ते १२५, हिरवा वाटाणा- १७५, छोला - १२० ते १५०.

हंगाम लांबला; उत्पादनात वाढ

पेरूचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लांबला असून उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बारमाही परदेशी गुलाबी पेरूची मागणी कायम असून स्थानिक पेरूची आवकही वाढलेली आहे. सांगली, मिरज आणि इंदापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात पेरू इचलकरंजी बाजारात येत आहे. मागणीपेक्षा अधिक पुरवठा झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत पेरूचे दर कमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT