Fruit  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Market : मालेगावच्या फळ बाजाराला झळाळी

Fruit Market Update : टरबूज व खरबूजाची आवक कमी झाली असून सध्या फळांचा राजा आघाडीवर आहे. फळांची आवक वाढल्याने समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : येथील बाजार समितीत विविध फळांची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने फळ बाजाराला झळाळी आली आहे. शहर व परिसरात शेकडो हातगाड्यांवर आंब्यासह इतर फळे विकले जात आहेत. टरबूज व खरबूजाची आवक कमी झाली असून सध्या फळांचा राजा आघाडीवर आहे. फळांची आवक वाढल्याने समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवाय फळ विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे.

येथील बाजार समितीच्या फळफळावळ विभागात दररोज शेकडो क्विंटल फळे विक्रीसाठी येत आहेत. घाऊक व्यापारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून उच्च प्रतीचा डाळिंब खरेदी करत आहेत. मात्र, मध्यम व सर्वसाधारण प्रतीचा डाळिंब येथील बाजारात विक्रीसाठी येत आहे. सध्या सर्वसाधारण डाळिंबच्या एका कॅरेटला १५०० ते २२०० रुपयापर्यंत भाव आहे.

चिक्कूची देखील चांगली आवक आहे. चिकूसाठी ३५० ते ४५० रुपये प्रति कॅरेटचा भाव आहे. पेरू २५० ते ५५० रुपये प्रतिकॅरेट विकला जात आहे. खरबूज १० ते १८ रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत आहे. मोसंबीच्या प्रति कॅरेटसाठी ४३० ते ६०० रुपयापर्यंत भाव आहे. सफरचंद (सिमला) प्रति पेटीचा दर ८५० ते १९०० रुपया दरम्यान आहे. बाजारात रोज दहा ते बारा टन टरबूज विक्रीसाठी येत आहे. टरबूजचा भाव २ ते ५ रुपये किलो दरम्यान आहे.

द्राक्षांची आवक देखील कमी होवू लागली आहे. सध्या येथील बाजारात दररोज ८ ते १० क्विंटल द्राक्ष विक्रीसाठी येत आहेत. प्रति कॅरेटचा भाव ३५० ते ५५८ रुपया दरम्यान आहे. चिंच मोठ्या प्रमाणावर येत असून रोज ११० ते १२० क्विंटल आवक आहे. भाव ४९ ते ८० रुपये प्रतिकिलो आहे.

भाजीपाल्याची आवक कमी

येथील बाजारात गेल्या चार दिवसापासून आंब्यांची रेलचेल आहे. लालबाग, बदाम, केशर व हापूस या प्रजातीचे आंबे विक्रीसाठी येत आहेत. आंब्यांचे दर ७० ते १४० प्रतिकिलो दरम्यान आहे. किरकोळ बाजारात ८० ते २५० रुपये किलोदरम्यान आंबे विकले जात आहेत. आंबे व इतर फळ विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. सध्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. भाजीपाला विक्री करणारे हातगाडीवरील व्यावसायिक आंबे व इतर फळांकडे वळले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT