Team Agrowon
उन्हाळ्यामध्ये (एप्रिल-मे) २ मीटर रुंदीचे शेडनेट झाडांच्यावर साधारण ०.७५ मी उंचीवर बांधावे. फांद्या शेडनेटला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्यावी.
शेडनेट प्रकाशाची तीव्रता ५० टक्के आणि तापमान अंदाजे ५ ते ६ अंश सेल्सिअसने कमी करण्यात प्रभावी ठरते, परिणामी सनबर्न आणि रोगाचा प्रादुर्भाव यामध्ये अनुक्रमे, ९० टक्के आणि ३५ टक्क्यांपर्यंत घट होते.
शेडनेटमुळे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे वनस्पती उन्हाळ्यात सुद्धा अन्न तयार करण्याची प्रक्रिया अखंडित ठेवतात.
सावलीखाली सुधारित सूक्ष्म-हवामान बदलामुळे कमीत कमी १५ दिवस अगोदर फुलधारणा होते. याव्यतिरिक्त फलदायी क्लॅडोड्स (फांद्याचे) प्रमाण वाढते, कळी गळण्याचे प्रमाण कमी होते आणि फुलधारणा अधिक होते.
शेडनेटच्या वापरामुळे फळांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात ४० ते ७० टक्के अधिक सुधारणा होते.
सनबर्नच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि दर्जेदार फळांच्या सुधारित उत्पादनासाठी ५० टक्के काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या शेडनेटची शिफारस करण्यात आली आहे.
शेडनेटमुळे लवकर फुलधारणा, वनस्पती संरक्षण रसायनांवरील कमी अवलंबित्व, वाढीव आर्द्रता टिकवून ठेवली जाते
चांगल्या प्रतीची फळे येतात याशिवाय फळांची संख्याही वाढते. त्यामुळए शेडनेटसाठी केलेली सुरुवातीची गुंतवणूक ही फायद्योयाचीच ठरते.