Onion Export Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : सोलापूर बाजार समितीत सोमवारी १४०० कांदा गाड्यांची आवक

Solapur Market Committee : २८०० चा दर २२०० रुपयांवर, निर्यातबंदीचा फटका

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Solapur Market Committee Onion Arrival : सोलापूर ः कांद्यावरील निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर पडणार हा धसका घेत शेतकऱ्यांकडून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी (ता.११) एकाच दिवसात उच्चांकी १४०० गाड्यांची आवक झाली.

बाजार समितीच्या आवारात यामुळे कांदा ठेवायलाही जागा नव्हती, एवढी आवक झाली. या आवकेमुळे दर मात्र ४०० ते ६०० रुपयांच्या फरकाने घसरले. अगदी दोन दिवसांपूर्वी सरासरी प्रतिक्विंटलचा २८०० रुपयांचा दर थेट २२०० रुपये प्रतिक्विंटलवर आला.

महाराष्ट्र, तेलंगण आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीला मोठे महत्त्व आहे. विशेषतः नाशिकनंतर कांद्यामध्ये सोलापूर बाजार समिती अव्वल आहे. उघड लिलाव आणि रोख पट्टीने शेतकऱ्यांचा कल सोलापूरकडे आहे. राज्यातील बीड, धाराशिव, लातूर, पुणे, नगर, सांगली आदी जिल्ह्यांतील कांदा सर्रास या बाजार समितीत येतो.

शिवाय तेलंगण, कर्नाटकसह शेजारच्या अनेक राज्यात जातो. त्यामुळे या भागातील खरेदीदार या कालावधीत सोलापुरात ठाण मांडून असतात. पण निर्यातबंदीच्या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून कांदा बाजाराला मोठा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यात रोज ४०० ते ५०० गाड्यांपर्यंत असणारी आवक सोमवारी (ता.११) तब्बल १४०० गाड्यांवर पोहोचली. तर कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मुख्यतः कांद्यावरील निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा दर पडणार, या धसक्याने शेतकरी घाईने कांदा काढून आणत आहेत.

सोमवारी यामुळे कांद्याचे प्रमाण अधिक राहिले. वाढत्या आवकेमुळे बाजार समितीचा आवार कांद्याने पूर्ण भरला होता. कांद्याच्या लिलावासाठी पाच सेल हॉल उभारले आहेत. पण तेही अपुरे पडले. त्यामुळे रस्त्यावर, मिळेल तिथे कांदा उतरविण्यात आला. बाहेर जाणाऱ्या गाड्या आणि बाहेरून आत येणाऱ्या गाड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत होती.

दर पडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत होते. याबाबत करमाळा येथील शेतकरी बळीराम जाधव म्हणाले, ‘‘आता कुठे कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र निर्यातबंदी निर्णयामुळे आमचे नुकसान झाले आहे. सरकार धड आम्हांला जगू देत नाही अन् मरूही देत नाही,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आज लिलाव बंद राहणार
बाजार समितीत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा आवक झाल्याने कांदा ठेवायला जागा नाही, शिवाय त्याचे वजन करण्याच्या कामाला वेळ लागणार आहे. त्यात नव्याने कांद्याची भर पडली तर आणखी अडचण होईल, यासाठी हमाल,

तोलार आणि अडत व्यापारी यांच्याशी चर्चा करून आज, मंगळवारी (ता.१२) एक दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT