Market Committee : नंदुरबार बाजार समितीत धान्याची आवक वाढली

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार धान्य सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, गव्हाची आवक वाढली आहे.
Market Committee
Market Committee Agrowon
Published on
Updated on

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ( market committee) भुसार धान्य सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, गव्हाची आवक वाढली आहे. यात सोयाबीनला उच्‍चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Market Committee
Soybean Market : सोयाबीनच्या दरात २०० रुपयांची सुधारणा | Agrowon| ॲग्रोवन

नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालाला रोकडा पैसा देत असल्याने परजिल्ह्यांतीलही सर्वाधिक शेतकरी येथे धान्यमाल विक्रीसाठी येतात. त्यामुळे येथील बाजार समितीत धान्याची आवक नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. सध्या सोयाबीन, गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी आदी शेतकऱ्यांचा माल काढून बाजार समितीत येत आहे. त्यामुळे या भुसार मालाची आवक वाढली आहे.

शनिवार आणि रविवार दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (ता. ७) कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वाहने घेऊन दाखल झाले होते. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी या धान्याची आवक मोठ्या प्रमाणावर होती. सोयाबीनची आवक दोन हजार क्विंटलपर्यंत होत असून, दरही ५००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

Market Committee
Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांचे आज मंथन बैठक

मक्याची आवक चार हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिकहोत असून, दर मात्र १५०० ते १६०० रुपये किलो मिळत आहे. बाजरीनेही यंदा बाजी मारली आहे. बाजरीला २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत.

गुजरातमध्ये मागणी अधिक

येथील बाजार समितीत असलेल्या अडत दुकानदारांमार्फत येथील धान्याला गुजरातमध्ये सर्वाधिक मागणी असते. काही व्यापारी स्वतः येथे येऊन बोली लावतात, तर काही व्यापारी नेहमीच्या अडत दुकानदारांमार्फत आपली मागणी नोंदवितात. त्यामुळे येथील शेतकऱ्याच्या धान्याला इतर बाजार समितीपेक्षा नक्कीच काही प्रमाणात दर जास्त मिळतो. शिवाय अडत दुकानदारांमार्फत शेतकऱ्यांना विक्री झालेल्या मालाची रक्कम रोखीने उपलब्ध होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com