Vineyard  Agrowon
ॲग्रो विशेष

Vineyard Production : संकटांमुळे द्राक्षाची क्षेत्र घटीकडे वाटचाल

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : जिल्ह्यातील कडवंची या द्राक्षाच्या आगारावर संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. जवळपास २० ते ३० टक्‍के द्राक्ष बागा उत्पादनात घट, तरीही न वाढणाऱ्या दरामुळे उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. नोटबंदी व त्यानंतर कोरोना संकटकाळापासून सुरू असलेली द्राक्ष बागांवरील संकटे पाठ सोडायला तयार नाहीत. त्यामुळे द्राक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची परिसर द्राक्षाचे आगार म्हणून ओळखले जाते. या परिसरातील नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी आदी शिवारांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाना, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.

नोटबंदीआधी द्राक्षांना सरासरी ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत होता. तो आता पाच वर्षानंतर २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे. अलीकडच्या पाच वर्षांत द्राक्ष लागवड करणारे आणि क्षेत्र कमी असणारे या अस्मानी व सुल्तानी संकटाच्या दुष्टचक्रात सर्वाधिक भरडले गेले आहेत.

दर दबावातच

यंदा द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या द्राक्षांना ४० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळाले. परंतु ते टिकले नाहीत. दुसऱ्याच आठवड्यात २० ते ३० रुपये प्रतिकिलो व जानेवारी संपताना दर १५ ते २५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले. मोजक्‍या बागांमधील काळ्या द्राक्षांना ८५ रुपये प्रतिकिलो मिळणारे दर आता ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

गत आठवड्याच्या तुलनेत या महिन्याच्या सुरवातीला ४ ते ५ रुपयांनी दर वाढले. हे दर वाढत राहिले तरच उत्पादकांना परवडणारे दर मिळतील, अशी आशा आहे. आतापर्यंत अपेक्षित व्यापाऱ्यांनीही द्राक्ष आगारात प्रवेश केलेला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बांगांमधील माल व्यापाऱ्यांनीही सोडून दिला. त्यामुळे त्यांनाही संकटाचा सामना करावा लागल्याची स्थिती आहे.

लवकर छाटण्या घेणाऱ्यांना मोठा फटका

कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या यंदा पाण्याच्या संकटामुळे अनेक उत्पादकांनी आधी घेतल्या. पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या सप्टेंबरमध्ये २० ते २५ टक्‍के झाल्या. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये नियमित वेळी साधारणतः: ५० ते ६० टक्‍के व नोव्हेंबरमध्ये म्हणजे उशिराने जवळपास २० ते २५ टक्‍के छाटण्या झाल्या.

छाटण्यांच्या तीन टप्प्यात अर्ली छाटण्यांवर अवेळी पावसाने संकट ओढावले. जवळपास ८० टक्‍क्‍यांपर्यंत या बागांचे नुकसान झाले. डाऊनी, भुरी, घडकुज आदी आक्रमणे द्राक्ष बागांवर झाल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. लवकर व नियमित छाटण्या घेणाऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत जवळपास ५० टक्‍के नुकसान झाले आहे.

मार्चमध्ये दरवाढीची अपेक्षा

द्राक्षाची मागणी असलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही थंडी कायम आहे. वातावरणामुळे द्राक्षांच्या चवीवर झालेला परिणाम, मागणी असलेल्या भागातील वाढती थंडी, मागणीपेक्षा पुरवठा जास्त यामुळे द्राक्षांचे दर दबावात असल्याचे द्राक्ष उत्पादक व व्यापाऱ्यांनी सांगितले. मार्चमध्ये येणाऱ्या बागांची संख्या कमी असल्याने त्यावेळी उत्पादनात मागणीच्या तुलनेत मोठी घट येऊन दरवाढीची अपेक्षा द्राक्ष उत्पादकांना आहे.

पावसाचे वर्तविले जाणारे अंदाज नुकसानीत भर घालत आहेत. अर्थात ते वर्तवावे, मात्र द्राक्ष बागांचा विचार करून चार-पाच दिवस आधी अंदाज दिला तर व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबेल. निसर्गाच्या आघाताबरोबरच कमी दरामुळे कंबरडे मोडलेय.
- विक्रम क्षिरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना.
पाच वर्षांपासून अस्मानी व सुल्तानी संकटाची मालिका सुरू आहे. गतवर्षी १८ एकर असणारी द्राक्ष बाग मी ६ एकरांवर आणली. अशीच स्थिती राहिली तर ६० ते ७० टक्‍के बागा संपतील. फेब्रुवारीनंतर संकटांचे खरे चित्र स्पष्ट होईल.
- दत्तूभाऊ चव्हाण, द्राक्ष उत्पादक, नंदापूर, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT