डॉ. एस. बी. पाटुळे, डॉ. एस. एस. रामटेकेहिवाळा ऋतू म्हशींच्या प्रजननासाठी अनुकूल असतो. कारण उष्णतेचा कमी ताण, चाऱ्याची मुबलक उपलब्धता, पोषक हवामानामुळे गर्भधारणा दर चांगले असतो. तरीदेखील, काही गैरहंगामी कारणांमुळे म्हशींमध्ये वंध्यत्व आढळू शकते. त्यामुळे, योग्य निदान आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे असते..माजाची योग्य ओळखहिवाळ्यातसुद्धा काही म्हशी मुका माज दाखवतात.दररोज सकाळी आणि संध्याकाळी म्हशीचे निरीक्षण करावे.हलकेसे ओरडणे, शेपूट उचलणे, वारंवार लघवी करणे ही लक्षणे दिसतात.टीझर बूल, माजाची लक्षणे ओळखणाऱ्या साधनाचा वापर करावा.कृत्रिम रेतन व्यवस्थापनमाजाची पहिली लक्षणे दिसल्यावर १२ ते १८ तासांनी कृत्रिम रेतन करावे.उच्च गुणवत्तेच्या रेतमात्रांचा वापर करावा. कृत्रिम रेतनाच्या वेळेस स्वच्छता ठेवावी..निदान आणि निरीक्षणइतिहास ः मागील गर्भधारणा, शेवटचा वेत, कृत्रिम रेतनाची वेळ व पद्धत.गर्भाशय तपासणी: गर्भाशय व अंडाशय स्थिती.अल्ट्रासोनोग्राफी: स्त्रीबीजाची वाढ व गुणवत्ता, गर्भ, सिस्ट तपासणी करावी.मादी प्रजनन संस्था संसर्ग, स्त्राव तपासावा.ताण कमी करण्याचे उपायअतिशय कमी हाताळणी करावी. अचानक बदल टाळावा.उबदार, स्वच्छ व आरामदायक निवारा द्यावा. गोठा कोरडा ठेवावा. गोठा हवेशीर असावा..Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर.फायदेशीर हिवाळाहिवाळ्यात तणाव कमी प्रमाणात असतो. त्यामुळे माजाचे लक्षणे अधिक स्पष्ट व लांब काळ दिसतात.योग्य वेळी गर्भधारणा (कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संगम) शक्य होते. प्रारंभिक भ्रूण मृत्यूचे प्रमाण कमी होते. गाभण राहण्याचे प्रमाण वाढते.हिवाळ्यात हायपोथॅलॅमस-पिट्यूटरी-गोनॅडल अॅक्सिस चांगले कार्य करते.यामुळे संप्रेरक संतुलन चांगले राहते.नियमित माजाचे ऋतुचक्र असते. माजाची स्पष्ट लक्षणे दिसतात. अधिक स्त्रीबीजत्सर्ग दर असतो.चांगल्या प्रतीचे स्त्रीबीज आणि भ्रूण प्राप्ती होते..आरोग्य व्यवस्थापनहिवाळ्यात पोषणयुक्त हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोअर सुधारतो.संप्रेरक क्रिया सुधारते. गर्भाशयाचे आरोग्य आणि भ्रूणविकासासाठी उपयुक्त ठरते. म्हशींना गडद त्वचा, कमी घामग्रंथी आणि जाड त्वचेमुळे उष्णतेचा ताण अधिक होतो. हिवाळ्यात हवामान थंड व आरामदायक असते, जे म्हशींसाठी कमी तणावदायक असते.उष्णतेचा ताण असल्यास माजाची लक्षणे कमी स्पष्ट दिसतात किंवा मुका माज दिसतो. संप्रेरकाचे संतुलन बिघडते. स्त्रीबीजत्सर्ग आणि भ्रूणाच्या जिवंत राहण्यावर परिणाम होतो..Animal Care : दुधाळ जनावरांमधील सुप्त कॅल्शिअम कमतरता .संसर्गाचे नियंत्रणप्रसूतीसाठी स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेली कोरडी जागा निवडावी.कृत्रिम रेतनानंतर संसर्ग संशयित असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.वंध्यत्वाचा प्रकार आणि कारणेप्रकार सामान्य कारणेमाजावर न येणे अपुरा आहार, मुका माज,संप्रेरकांचे असंतुलन..रिपीट ब्रीडिंग (उलटणे ) गर्भाशयातील संसर्ग, कृत्रीम रेतनाची वेळ आणि पद्धत.लैंगिकअपरिपक्वता अपुरे पोषण, खनिज मिश्रण, जीवनसत्त्वांची कमतरता.प्रसूतिपश्चात वंध्यत्व गर्भाशय संसर्ग, अपूर्ण गर्भाशय आकुंचन, अडकलेले अपत्य,वेळेवरवार न पडणे.पोषण व्यवस्थापनहिवाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, परंतु हिवाळ्यातसुद्धा पोषणाची कमतरता वंध्यत्वास कारणीभूत ठरते..पोषणतत्त्व प्रजननातील भूमिका स्रोतऊर्जा हार्मोन निर्मिती चांगल्या प्रतीचा हिरवा चारा, धान्य.प्रथिने अंडाशय कार्य, हार्मोन संश्लेषण तेलबिया पेंड, कडधान्य.खनिजे माज व स्त्रीबीजत्सर्ग खनिज मिश्रणजीवनसत्वे गर्भाशयाचे आरोग्य,गर्भ वाढ हिरवा चारा, पूरक व पोषक पशुखाद्य आणि आहार.टीप ः मादी जनावरास दररोज ३० ते ६० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. तसेच ५ लिटर प्रति दिन दूध देणाऱ्या दुभत्या जनावरास चारा, पशुखाद्य व खनिज मिश्रण वाढीव दीड ते दोन पट दराने जास्त द्यावे.- डॉ. एस. बी. पाटुळे, ९८३४२८८४४८(पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.