Kumbhari Village Development : परभणी जिल्ह्यात दूधना नदीकाठी वसलेल्या कुंभारी गावाला असलेला पुराचा धोका टाळण्यासाठी १९७० च्या दशकात ग्रामस्थांचे उंच ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. नव्या लोकवस्तीत २०२३ पर्यंत पक्के रस्ते नव्हते. चिखलाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागे. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नव्हती. शेतातील माल घरी व बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत असे एकत्र आले. सन २०२३ मध्ये त्यातून गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातील उपक्रमांची नेटक्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यातून गावाने अल्पावधीत जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे..कुंभारी गाव दृष्टिक्षेपातभौगोलिक क्षेत्र- ४९९ हेक्टर, पैकी लागवड योग्यक्षेत्र- ४९५ हे.लोकसंख्या- ११३५प्रमुख पिके- सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, गहूखरीप व रब्बी क्षेत्र- ४९० हेक्टर तर फळबाग क्षेत्र- ५ हे..Smart Village : काटेवाडी, सोरतापवाडी गावे होणार ‘स्मार्ट’.विकासाला चालनाथेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच पार्वती शेषराव हारकळ यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकास प्रक्रिया अधिक गतिमान झाली. उपसरपंच रामदास आवरगंड, सदस्य सुनीता दळवे, सुधामती हारकळ, रुक्मिणी शिंदे, लक्ष्मी चौधरी, अशोक हारकळ, उद्धव चौधरी, माणिकराव हारकळ, ग्रामविकास अधिकारी अशोक रेंगे यांचा सहभाग लाभलाच. 'शिवाय गावातील युवक, महिला, शेतकरी अशा सर्व घटकांचे सहकार्य मिळाले. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांनी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून घेतली. रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रिटीकरण झाले. पेव्हर ब्लॉक्स बसविण्यात आले. काळी खोल माती असल्याने रस्त्यांचे मजबुतीकरण व कामांच्या दर्जा राखण्यावर भर देण्यात आला. म्हणूनच अनेक वर्षांनंतर आज रस्ते चिखलमुक्त झालेले दिसत आहेत..ठळक विकासकामे...रस्त्यांच्या दुतर्फा सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्यात आली.गावातील कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला आहे.रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड. सौर पथदिवे. चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे.पंतप्रधान घरकुल योजना तसेच अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ९० मंजूर घरकुले.पैकी ४५ घरकुलाचे बांधकाम पूर्ण.बंदिस्त गटारे बांधण्यात आली. घरोघरचा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित.गावातील सर्व समाजासाठी एकच स्मशानभूमी आहे. तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता, वृक्ष लागवड, पाणी व आसन व्यवस्था. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी स्वच्छतेवर देण्यात येतो भर.शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ फिल्टर यंत्रणा. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर.आगामी काळात कुटुंबांना गरम पाणी सुविधा व सर्व घरांना एक रंग देण्याची संकल्पना..Smart Village : निगवे दुमाला ठरले स्वच्छ, सुंदर गावचा आदर्श नमुना.यांचे लाभले मदतीचे हातउपक्रमांना पालकमंत्री मेघना साकोर-बोर्डीकर यांचे मार्गदर्शन व संकल्पना लाभल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. शंभू मित्रमंडळ अंतर्गत युवकांचा सक्रिय सहभाग असतो. दोन लाखांच्या लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी यांना विविध साहित्य भेट देण्यात आले. पाणीपुरवठा व्यवस्था, संरक्षक भिंत उभारण्यात आली. मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. खुली व्यायामशाळा सुरू झाली. मुख्याध्यापक अर्जुन लटपटे, सहशिक्षक प्रदीप यादव, सुनीता माने यांच्या प्रयत्नांतून शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मदत लाभली..शेतीतील प्रगतीगावशिवारात दुधना नदीकाठची काळी कसदार सुपीक जमीन आहे. अलीकडील काळात गावातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. आंबा लागवड आहे. मजूर समस्येवर मात करण्यासाठी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, नांगर, वखर पास, तिऱ्ही, रोटाव्हेटर, मळणी यंत्र आदी यांत्रिकीकरणावर भर आहे. सुमारे ४० ट्रॅक्टर व दोन कंबाईन हार्वेस्टर्स आहेत. सिंचनासाठी बोअर तसेच निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा लाभ मिळत आहे. ठिबक, तुषार संचांचा वापर होतो. बहुतांश शेतकऱ्यांकडे सौरपंप आहेत. त्यामुळे दिवसा अखंड वीजपुरवठा होतो. रुंद वरंबा पद्धती, सुधारित तंत्रज्ञान, काटेकोर व्यवस्थापन आदी बाबींमधून सोयाबीन एकरी ८ ते १० क्विंटल, कपाशी ७ ते १२ क्विंटल तर हरभरा १२ ते १५ क्विंटल अशी उत्पादकता गावातील शेतकऱ्यांना साध्य झाली आहे. महाडीबीटी अंतर्गत यंदा पाच हार्वेस्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र आदींसाठी २०० लाभार्थींची निवड करण्यात आल्याचे सहायक कृषी अधिकारी जी. यू. बोबडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आदींच्या माध्यमातून शेतीतील जोखीम कमी केली आहे. गावात मुऱ्हा व जाफराबादी अशा मिळून ८० ते १०० म्हशी आहेत. दररोज २५० ते ३०० लिटर दुधाचे संकलन होते. बोरी येथे प्रति लिटर ६० ते ७० रुपये दराने विक्री होते..महिलांची आत्मनिर्भरता : उमेद अभियानाच्या माध्यमातून १३ महिला स्वयंसाह्यता गट स्थापन झाले आहेत. गटांमध्ये १४६ सदस्य आहेत. त्यांच्यामार्फत पापड, शेवई, डाळ निर्मिती उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांतून आर्थिक सक्षमीकरण होण्यासह महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळाली आहे.प्रातिनिधिक उदाहरणे द्यायची तर सुशीला संतोष आवरगंड यांनी परभणी येथील भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून यंदाच्या मेमध्ये मूग, उडीद, नाचणी आदींपासून पापड निर्मितीचा गृहउद्योग सुरू केला आहे. सुजाता विजय चौधरी यांनी डाळ मिल सुरू केली आहे..दिल्ली येथे सन्मानपायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, सर्वसमावेशक उपक्रम, हर घर जल, पंतप्रधान घरकूल योजना (ग्रामीण) आदी योजनांची गावाने प्रभावी अंमलबजावणी केली. स्थानिक गरजांनुसार नवे उपक्रम राबवले. याची दखल घेत यंदा नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कुंभारीच्या सरपंच पार्वती शेषराव हारकळ यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी केंद्र सरकारच्या पंचायतराज विभागाकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.पार्वती हारकळ ७५०७७५१२१२, ९८२२५१९०९१ (सरपंच)अशोक रेंगे ९४२३४०७९५९(ग्रामविकास अधिकारी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.