Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Report : एप्रिलच्या ‘अवकाळी’मुळे सव्वा लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Crop Damage Update : राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) धुमाकूळ ऐन मे महिन्यातदेखील सुरू आहे. एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळीमुळे सव्वा लाख हेक्टरवरील पिके नष्ट (Crop Damage) झाल्याची माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली.

राज्यात एप्रिलमधील गारपीट, अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला आहे. नाशिकच्या सटाणा, मालेगाव, नांदगाव, कळवण, देवळा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांतील तब्बल ३७ हजार ९८१ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहे.

यात मुख्यत्वे भाजीपाला, कांदा आणि फळपिकांचा समावेश आहे.
नगर जिल्ह्यातदेखील मोठे नुकसान झाले आहे. नगरच्या दहा तालुक्यांतील २० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.

नगरसह कर्जत, राहुरी, संगमनेर, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, जामखेड व श्रीरामपूर तालुक्यांतील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसहीत डाळिंब आणि आंबा बागांचे मोठे नुकसान झालेले आहे.

या विभागातील आधी खरीप, त्यानंतर रब्बी आणि आता उन्हाळी पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीने मातीमोल केले आहे.


महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील, बीड जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील, तर जालना जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिके मातीमोल झाली आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील बाजरी, गहू, कांदा, भाजीपाला, सूर्यफूल, तर बीडमधील लिंबू, द्राक्षे, कांदा, गहू, हरभरा, डाळिंब आणि आंबा बागांचे नुकसान झालेले आहे. जालना जिल्ह्यात गहू, हरभरा, कांदा आणि डाळिंब पिकाची मोठी हानी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.


धाराशिव जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील गहू, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला यांसह आंबा, मोसंबी, द्राक्षे अशा फळबागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, कंधार, लोहा, हदगाव, किनवट, माहूर भागांतील साडेपाच हजार हेक्टरवरील गहू, मका, कांदा, केळी, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचे होत्याचे नव्हते झालेले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथे पाच हजार ७०० हेक्टरवरील गहू, मका, कांदा, केळी, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला नष्ट झाला आहे.
अमरावती विभागात सर्वाधिक हानी अकोला जिल्ह्यात झाली आहे.

अकोलासह बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील १२ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. यात लिंबू, भुईमुग, कांदा, हरभरा आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे.

अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ५०० ते १००० हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे उद्धवस्त झाली आहेत.

पंचनाम्यात अडचणी
राज्यातील काही जिल्ह्यांमधील एकूण नुकसानीचा अंदाज अद्यापही आलेला नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल मंत्रालयात पाठवेपर्यंत इकडे पुन्हा गारपीट किंवा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतो आहे.

त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कृषी, ग्रामविकास आणि महसूलची यंत्रणा पुन्हा केवळ पंचनाम्याच्या कामात गुंतून पडली आहे. राज्यात अशी स्थिती २०१३-१४ मध्ये उद्भवली होती. तेव्हा मार्चमध्ये काही भागात वारंवार गारपीट झाली होती.

उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ
अवकाळी पावसामुळे राज्यातील फळबागांना मोठा तडाखा बसला आहे. केळी, आंबा, द्राक्ष बागांचे तसेच आंबिया बहरातील संत्रा, मोसंबीचे नुकसान होते आहे. मात्र, इतर उन्हाळी पिकांचा पेरा वाढला आहे.

हा उन्हाळी पेरा यंदा अडीच लाखांहून चार लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. अवकाळी पावसामुळे काही भागांतील उन्हाळी मका, भुईमूग आणि भात पिकाचे क्षेत्रदेखील वाढले आहे, असे कृषी खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT