Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Wildlife Management : हंड्या-कुंड्या प्रकल्प क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनला मान्यता

A Wildlife Management Plan : हंड्या -कुंड्या लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे (देव्हारी, ता. चोपडा) यावल अभयारण्यातील बाधित होणाऱ्या वनक्षेत्रासाठी वन्यजीव व्यवस्थापन योजना मंजूर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : हंड्या -कुंड्या लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे (देव्हारी, ता. चोपडा) यावल अभयारण्यातील बाधित होणाऱ्या वनक्षेत्रासाठी वन्यजीव व्यवस्थापन योजना मंजूर करण्यात आली आहे.

यामुळे वन्यजीवांना अधिवासास कोणताही अडथळा येणार नाही. या योजनेसाठी लघू पाटबंधारे विभागाने वन विभागाला एक कोटी ३८ लाख ७२ हजार रुपये द्यावेत, असा निर्णय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नुकताच घेतला. यावल अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावलचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, लघू पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता आ. नि. सूर्यवंशी, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जैव विविधताचे सदस्य लक्ष्मीनारायण सोनवणे, सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत,‌ लघू पाटबंधारे विभागाचे सल्लागार‌ उज्वल पाटील आदी उपस्थित होते.

हंड्या-कुंड्याच्या साठवण तलावासाठी ३१.४९ हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रकल्पात बाधित होणाऱ्या वन जमिनीसाठी वनसंवर्धन (अधिनियम) १९८० अंतर्गत केंद्र सरकारची तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. समितीने प्रकल्प भागातील वन्यजीवांना अधिवासास योग्य असे पर्यावरणीय वातावरण राहावे यासाठी वन्यजीव व्यवस्थापन योजना तयार करण्याचा निर्णय घेतला.

योजनेसाठी येणारा खर्च लघू पाटबंधारे विभागाकडून वसूल करण्यात यावा. त्यानुसार लघू पाटबंधारे विभागाने प्रकल्पासाठीचा निधी वन विभागाकडे हस्तांतरित करावे, असे समितीने निर्णय घेतला. श्री. शेख हे समितीचे सचिव असून, त्यांनी आराखडा या विषयातील तज्ज्ञांच्या साह्याने बनविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार

Anjani Project : अंजनी प्रकल्पासह वसंत कारखाना पुन्हा चर्चेत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसीठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा १,५०० रुपयांचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात

Farmer Relief: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी ५ कोटी मंजूर

Maize Crop Damage: बुलडाण्यात पावसाचा मका पिकाला तडाखा

SCROLL FOR NEXT