Maharashtra Wildlife Board : राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना

Wildlife : महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्यासह अनुज खरे, चैत्राम पवार यांना मंडळात स्थान देण्यात आले आहे.
Wildlife
Wildlife Agrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्यासह अनुज खरे, चैत्राम पवार यांना मंडळात स्थान देण्यात आले आहे. “मनुष्य व वन्यजीवांतील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी नवे मंडळ प्रयत्न करेल,” असे नवनियुक्त सदस्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्षपद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. मंडळातील नव्या सदस्यांची नावे अशी ः आमदार सुधीर मेघे, संदीप धुर्वे, आशिष जयस्वाल, डॉ. अंकुर पटवर्धन (पुणे), नेहा पंचमिया (पुणे), रमण कुलकर्णी (कोल्हापूर), अनुज खरे (पुणे), किरण शेलार (मुंबई), प्रवीण परदेशी (मुंबई), धनंजय बापट (नागपूर), श्रीकांत टेकाडे (नागपूर), चैत्राम पवार (धुळे), विनायक थलकर (पालघर). याशिवाय बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेक्शन ट्रस्ट व टायगर रिसर्च अॅन्ड कॉन्झर्व्हेक्शन ट्रस्टचे प्रतिनिधी मंडळात असतील.

Wildlife
Wildlife Attack : प्राण्यांच्या उपद्रवाचा फळ लागवडीला फटका

धुळ्याच्या बारीपाडा भागात शेती, जंगल आणि पर्यावरणात देशपातळीवरचे प्रयोग करणारे शेतकरी चैत्राम पवार म्हणाले, ‘‘वन्यजीव मंडळाद्वारे वन्यजीवांबरोबरच वने व दऱ्याखोऱ्यातील आदिम जमातींच्या समस्यांवर काम केले जाईल. या जमाती मुख्यत्वे शिकार, वनोपज आणि शेतीवर उपजीविका करतात.’’

Wildlife
Wildlife Crop Damage : आजऱ्यात वन्यप्राण्यांसंदर्भात बैठक

खरे म्हणाले, ‘‘मनुष्य व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी सूक्ष्म पातळीवर मंडळ काम करेल. वाघांप्रमाणेच आता जंगली हत्तीच्या संरक्षणासाठी प्रकल्प उभारावे लागतील. वन्यजीव प्रकल्पांमधील गाभा तसेच बाह्य क्षेत्राचे व्यवस्थापन सध्या वन्यजीव विभाग व प्रादेशिक विभाग अशा दोन स्वतंत्र यंत्रणा हाताळत आहेत. वन्यजीवांच्या हितासाठी ही कामे एकाच यंत्रणेकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’

सदस्य सचिवपद वनसंरक्षकाकडे

मंडळाचे सदस्य सचिवपद वन खात्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे आहे. झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वन्यजीव संचालक, मत्स्यविकास आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, सैन्य दलाचा ब्रिगेडिअर दर्जाचा अधिकारी, पोलिस खात्यातील महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी तसेच पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, आदिवासी विकास विभाग तसेच वन खात्याच्या प्रधान सचिवांचाही यात समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com