Highway Agrowon
ॲग्रो विशेष

State Highway Survey : माढ्यातील राज्यमार्ग सर्व्हेला मंजुरी

Team Agrowon

Solapur News : माढा विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्गांच्या सर्व्हेसाठी हायब्रीड ॲन्युइटी योजनेच्या टप्पा- २ अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता मिळाल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

माढा मतदारसंघातील राज्य मार्ग २०१ माढा- उपळाई (बुद्रूक) - बावी- मोडनिंब- करकंब- उंबरे- नेवरे- माळखांबी-वेळापूर ते प्रमुख राज्य मार्ग १५, रस्ता राज्य मार्ग ३९५ (माढा ते वेळापूर) व कंदर- दहिवली- निमगाव- पिंपळनेर- उजनी- वरवडे- परिते- बेंबळे- कान्हापुरी- उंबरे (पागे)- उंबरे (वेळापूर)- नेवरे- नांदोरे- कुरोली- शेवते- भोसे- पांढरेवाडी- मेंढापूर- रोपळे- तुंगत- सुस्ते या रस्त्यांच्या कामासाठी हायब्रीड ॲन्युइटी योजनेच्या टप्पा- २ अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार आहे.

आमदार शिंदे म्हणाले, जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राज्य मार्गांची दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आले असून, त्याची कामे सुरू आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग २०१, माढा ते राज्यमार्ग ३९५ (माढा ते वेळापूर) या मार्गे वाहतूक सुरू आहे. परंतु, या मार्गावरून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

तसेच या मार्गाचा वापर तुळजापूर या तीर्थक्षेत्रास जाण्यासाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. तसेच कंदर- दहिवली- निमगाव- पिंपळनेर- उजनी- वरवडे- परिते- बेंबळे- कान्हापुरी- उंबरे (पागे)- उंबरे (वेळापूर)- नेवरे- नांदोरे- पटवर्धन कुरोली- शेवते- भोसे- पांढरेवाडी- मेंढापूर- रोपळे- तुंगत- सुस्ते हा रस्ता पंढरपूर तीर्थक्षेत्रास मिळत असल्याने हजारो वारकरी या मार्गाचा वापर करीत आहेत. या तसेच या भागामध्ये केळी, डाळिंब, ऊस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून, या भागात एमआयडीसीमुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाली आहे.

या दोन्ही रस्त्यांची सुधारणा झाल्यास या मार्गावरील अवजड वाहने, प्रवासी व भाविकांना वाहतुकीच्या दृष्टीने सुलभता येणार आहे. या दोन्ही मार्गांचा हायब्रीड ॲन्युइटी योजनेत समावेश करून या मार्गाची दर्जोन्नती करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. या रस्त्यांच्या कामास मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे.
- आमदार बबनराव शिंदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT