Gopinath Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Gopinath Munde Sanugrah Anudan: 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजने'ला राज्य सरकारची मान्यता; अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ

Gopinath Munde sugarcane workers welfare scheme: राज्य सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना' राबवण्यासाठी गुरुवारी (ता.१०) मंजूरी दिली आहे.

Dhananjay Sanap

Mumbai News: राज्य सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना' राबवण्यासाठी गुरुवारी (ता.१०) मंजूरी दिली आहे. उसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांचा अपघात मृत्यू झाला वा अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या पण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम झोपडी व बैलजोडी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यात ऊस तोडणी व वाहतुक्क करतांना होणारे अपघात, सर्पदंश विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अपघातात ऊसतोड कामगार मुकादम यांचा मृत्यू होतो वा अपंगत्व येतं. अशावेळी संबंधित व्यक्तिच्या अपघातामुळे कुटुंबाचं उत्पन्न बंद होते.

त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम, त्यांचे झोपडी आणि बैलजोडी यांचा अपघात विमा उतरवण्याची योजना राबवण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत ४ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेला मान्यता दिली आहे.

या योजेतून आग लागून झोपडी आणि सामग्रीचं नुकसान झालं तर १० हजार रुपये, वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, अपघातात अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, अपघातात वैद्यकीय खर्च ५० हजार रुपये, लहान बैलजोडी मृत्यू वा अपंगत्वासाठी ७५ हजार रुपये आणि अपघातात मोठ्या बैलजोडीचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहेत.

सानुग्रह अनुदाला पात्र कोण?

१) मृत कामगाराची पत्नी/पती

२) मृत कामगाराची अविवाहित मुलगी

३) मृत कामगाराची आई

४) मृत कामगाराचा मुलगा

५) मृत कामगाराचे वडील

६) मृत कामगाराची सून

७) अन्य कायदेशीर वारसदार

दरम्यान, राज्यातील १२७ सहकारी क्षेत्रातील व १२९ खाजगी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार काम करतात. यामध्ये बहुतांश ऊसतोड कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. विशेषत: बीड, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, तसेच अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील असून विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस फडावर स्थलांतरित होऊन काम करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT