POCRA Project Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Project : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी १.२० कोटींच्या निधी वितरणास मान्यता

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांना अंत्यत लाभदायक ठरणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास १.२० कोटींचा निधी वितरीत करण्यात मान्यता मिळाली आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागे मान्यता दिली आहे. याबाबत विभागाने शुक्रवारी (ता. ०५) आदेश काढला आहे. तर नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाकडून वेतन खर्चासाठी निधीची मागणी झाली होती. याप्रमाणे ही निधी देण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांतील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुर यांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ६ वर्ष कालावधीसाठी जागतिक बॅंकेने सुमारे ४००० कोटी रुपयांची उपलब्धता या प्रकल्पासाठी केली आहे.

यादरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेतन खर्चाचा निधी देण्याबाबत प्रकल्पाकडून शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. याप्रमाणे राज्याच्या हिश्श्यातील १.२० कोटींचा निधी वितरीत करण्यात मान्यता देण्यात आली आहे.

पीक संवर्धन, लहान शेतकरी आणि शेतमजुरांची योजना, हवामान अनुकूल कृषी प्रकल्पावर हा निधी खर्च करण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. तसेच कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागे काढलेल्या आदेशात खर्च आणि कामांचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भातील जिल्ह्यांसह पूर्णा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या खारपट्ट्यातील गावे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील एकूण ५१४२ गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश आहे.

प्रकल्पातील जिल्हे

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या खारपट्ट्यातील ९३२ गावे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, व नांदेड

Custard Apple Production: सेंद्रिय खतामुळे सीताफळाचे भरघोस उत्पादन

Maratha Reservation: मुंबईला जाणार, आरक्षण घेऊनच परतणार : मनोज जरांगे

Agricultural Relief: संततधार पावसाने बटाटा पिकाला जीवदान

E Peek Pahani: खरीप ई-पीक पाहणीचे ‘तीन तेरा’

Modi Government Criticism: भाजपची आता ‘सत्ताचोरी’ची तयारी : मल्लिकार्जुन खर्गे

SCROLL FOR NEXT