Aaple Sarkar Agrowon
ॲग्रो विशेष

Aaple Sarkar : ‘आपले सरकार’च्या ३१८ सेवा केंद्रांना मान्यता

Government Scheme : आपले सरकार सेवा केंद्राचा यापूर्वीचा २०० केंद्रांचा जाहीरनामा २०२१ साली प्रसिद्ध करण्यात आला होता.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील एकूण ३३० रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी २ हजार ९९८ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले. त्या अर्जाची छाननी करून पात्र आणि अपात्र उमेदवारांची- केंद्राची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली, त्यातून ३१८ केंद्रांची निवड अंतिम यादीत कऱण्यात आली आहे.

आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सीएससी २.० अंतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ३३० रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी २६ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, १२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यास अनुसरून आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीकरिता एकूण २ हजार ९९८ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले.

त्यामध्ये २ हजार ४०९ उमेदवार पात्र ठरले. ५८९ उमेदवार अपात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांमधून एकूण ३१८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज प्राप्त न होणे, अर्जदार स्थानिक नसल्याने सर्व उमेदवार अपात्र ठरणे, याबाबीमुळे सदरच्या केंद्राकरिता उमेदवारांची निवड करण्यात आलेली नाही.

तसेच ३ केंद्रांच्या उमेदवाराच्या बाबतीत तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने त्याबाबत सुनावणी अंती निर्णय घेण्यात येईल. स्थानिक रहिवासी, अर्जदाराचे वय वर्ष १८ पूर्ण असणे, अर्जदाराची किमान शैक्षणिक पात्रता १० पास (एसएससी), यासह पात्रतेनंतर आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गावाच्या भौगोलिक क्षेत्रातील सीएससी केंद्रधारकांना व संबंधित तालुक्यातील सीएससी केंद्रधारकांना प्राधान्य देण्यात आले आहे, असे काही निकष त्यासाठी लावण्यात आले.

संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

आपले सरकार सेवा केंद्राचा यापूर्वीचा २०० केंद्रांचा जाहीरनामा २०२१ साली प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रामाणावर जुलै २०२४ मध्ये ३३० केंद्राकरिता आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

सदरची निवड प्रक्रिया ही जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारे राबविण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्रांबाबत पात्र व अपात्र आणि निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी / केंद्रांची यादी https://solapur.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT