Farmer Foreign Tour Agrowon
ॲग्रो विशेष

Foreign Tour : परदेश दौऱ्यासाठी अर्ज करावेत

Dattatray Gavsane : सोलापुर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

Team Agrowon

Solapur News : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी या दौऱ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

‘‘शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये प्रतिलाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल,’’ असेही गावसाने यांनी सांगितले.

...या आहेत अटी

या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑस्टेलिया, सिंगापूर इ. संभाव्य देशाची निवड करण्यात आली आहे. लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा सातबारा व आठ ‘अ’ उतारा असावा.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. आधार पत्रिकेची प्रत, शेतकऱ्याचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा, अशा अटीही त्यासाठी आहेत. तसेच शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT