Farmer Foreign Tour : शेतकरी परदेश दौऱ्याच्या अटी, शर्थी जाचक

Agriculture Study Tour : जागतिक स्तरावर उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास व त्याचे अनुकरण करता यावे या उद्देशाने परदेश अभ्यास दौऱ्यांना बऱ्याच वर्षांनंतर शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली.
Foreign tour of farmers
Foreign tour of farmersAgrowon

Yavatmal News : जागतिक स्तरावर उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास व त्याचे अनुकरण करता यावे या उद्देशाने परदेश अभ्यास दौऱ्यांना बऱ्याच वर्षांनंतर शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली. मात्र त्यासाठीच्या जाचक अटी पाहता हा प्रकार सामान्य शेतकऱ्यांवर ‘भीक नको, पण अटी, शर्थी आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पूर्वी शेतकऱ्यांना केवळ ५० टक्‍केच रक्कम भरावी लागत होती. आता कंपनीकडे पूर्ण रक्‍कम भरल्यानंतर दौरा करून परतल्यावर संबंधितांच्या खात्यात रक्‍कम जमा केली जाणार आहे. ही अट सामान्य शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारी आहे.

जागतिक स्तरावर विविध पीक पद्धती त्यासोबतच उपलब्ध तंत्रज्ञानाचे अवलोकन करण्यासोबतच त्याचे अनुकरण करता यावे याकरिता विदेश अभ्यास दौऱ्याची योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येते. राज्य व केंद्र सरकारच्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना यासाठी प्राधान्य देण्यावर भर आहे.

Foreign tour of farmers
Farmer Foreign Tour : नित्य घडावी परदेश वारी

या वर्षी मात्र शासनाने अशा अभ्यास दौऱ्याकरिता अनेक जाचक अटी व नियम घालून दिले आहेत. त्याच्या परिणामी या योजनेला शेतकऱ्यांचा किती प्रतिसाद मिळेल, या बाबत आतापासूनच शाशंकता व्यक्‍त केली जात आहे.

अटीमध्ये शेतकऱ्याला अभ्यास दौऱ्याचा पूर्ण खर्च करावा लागणार असल्याने त्याने दोन ते तीन लाख रुपयांच्या रकमेची जुळवाजुळव कशी करावी, असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शेतकऱ्याला आधीच पैसे भरावे लागणार असल्याने त्याला त्याकरिता बॅंक किंवा खासगी कर्जच काढावे लागणार आहे.

...या देशात अभ्यास दौरे

जर्मनी, फॉन्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलॅंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या संभावित देशाची अभ्यास दौऱ्याकरिता निवड करण्यात आली आहे.

Foreign tour of farmers
Farmer Foreign Tour : विदेश अभ्यास दौऱ्यांसाठी ५ फेब्रुवारीपर्यंत याद्या द्याव्यात

वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शेतकऱ्यावर

२०१९ मध्ये गजानन वानखडे (खंडाळा, तेल्हारा, जि. अकोला) हे इस्राइल अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. परतीच्या दिवशी अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्‍का बसला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असताना त्यांना सोडून कृषी अधिकारी भारतात परतले.

या वेळी त्यांच्यासोबत त्याच भागातील लक्ष्मीकांत कौठकर थांबले आणि त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्यावर उपचार करून घेतले. दबावामुळे सरकारला १३ लाख रुपयांचा उपचार खर्च करावा लागला. त्यानंतर अनेक वर्षे अभ्यास दौरे बंद करण्यात आले होते.

...असे आहेत निकष

- लाभार्थी हा शेतकरी असावा.

- त्याचे नावे सातबारा, आठ- अ असावा.

- शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्‍तीला लाभ मिळेल.

- शेतकरी किमान बारावी पास हवा.

- २५ ते ६० वर्षे या दरम्यान वय हवे.

- शेतकऱ्यांना १०० टक्‍के प्रवास खर्चाचा हिस्सा प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरावा लागेल व त्याचा पुरावा कृषी विभागाला सादर करावा लागेल.

- अभ्यास दौऱ्यानंतर ५० टक्‍के शासकीय अनुदान थेट बॅंक खात्यात जमा केले जाईल.

- ५० टक्‍के अनुदान केवळ एक लाख रुपयाच्या पटीत राहणार आहे.

शेतकऱ्याला आधीच पूर्ण खर्च करावा लागेल ही अट जाचक आहे. त्यासोबचत वैद्यकीय खर्चाबाबतही विरोधाभासी धोरण आहे. सामान्य शेतकऱ्याने अभ्यास दौऱ्यात सहभागीच होऊ नये याकरिता ही नियमावली आहे. श्रीमंत किंवा शेतकरीच नसलेले यात अधिक सहभागी होतील. वैद्यकीय खर्चावर तोडगा काढण्यासाठी हेल्थ इन्शुरन्सचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. त्याबाबत विचार करण्याची गरज आहे.
- लक्ष्मीकांत कौठकर, अडगाव बु., तेल्हारा, जि. अकोला अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com