Spraying Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Spraying Pump Application : ‘महाडीबीटी’वर मागविले फवारणी पंपांसाठी अर्ज

MahaDBT Portal : राज्यातील शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वितरण करण्यासाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वितरण करण्यासाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडली आहे.

या योजनेतून फवारणी पंपांचा पुरवठा करण्यासाठी राबविलेल्या संशयास्पद निविदांच्या विरोधात राज्य शासनाकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी गेलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी पंपांचा पुरवठा तूर्त होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र आता पंप वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आल्यामुळे ठेकेदारांकडून पंपांचा पुरवठा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना या संकेतस्थळाचा वापर ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी करता येईल. या योजनेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

१४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, ही योजना राबविल्यामुळे कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना मिळेल. २०२२ ते २०२५ कालावधीत तीन टप्प्यात योजना राबविली जाईल. चालू २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी बॅटरीचलित फवारणी पंपासाठी लाभार्थी निवड होईल. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरी अर्जांतून ऑनलाइन पद्धतीने निवड होईल. अर्जांसाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT