Robotics
Robotics Agrowon

Robotics Spray Pump : भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केला 'रोबोटिक फवारणी पंप'

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) शास्त्रज्ञ दिलीप कुशवाह यांनी रोबोटिक फवारणी यंत्र विकसित केलं आहे. या यंत्रातून केवळ ग्रीनहाऊसमधील फवारणी करता येणार आहे.
Published on

ग्रीनहाऊसमध्ये रासायनिक फवारणी करताना शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो. विषारी पदार्थ किंवा अवशेष श्वास घेताना त्रास होतो. यावर उपाय शोधत भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) शास्त्रज्ञ दिलीप कुशवाह यांनी रोबोटिक फवारणी यंत्र विकसित केलं आहे. या यंत्रातून केवळ ग्रीनहाऊसमधील फवारणी करता येणार आहे. अलीकडेच आयएआरआयचा स्थापन दिवशी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं , त्यामध्ये या यंत्राचा समावेश होता. यासाठी १ लाख रूपये खर्च आला आहे. तसेच काही काही खाजगी कंपन्यांनी रोबोटिक फवारणी यंत्रात स्वारस्य असल्याचं कुशवाह म्हणाले.

या यंत्राची पाणी साठवण क्षमता ४० लीटर आहे. तसेच फवारणी करताना ग्रीनहाऊसमधील रोपांच्या उंचीनुसार तडजोड यंत्र करू शकतं. कारण यामध्ये विशिष्ठ सेन्सर बसवण्यात आले आहे. त्यामुळे फवारणीचं नोजल स्वयंचलितपणे काम करू शकतं. तयासाठी ग्रीनहाऊसच्या बाहेरून ऑपरेटर रिमोट कंट्रोलच्या मदतीने यंत्रावर नियंत्रण ठेवावं लागतं. रिमोट पॅनलवर स्क्रीन दिली आहे. त्यामुळे त्यातून फवारणी कुठे आणि किती प्रमाणात केली जात आहे, याची माहिती मिळते, असं कुशवाह म्हणाले. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो.

यामध्ये एक बॅटरी बसवण्यात आलेली आहे. बॅटरी पूर्ण चार्ज असेल तर २ तासात सुमार एक एकर क्षेत्रावरील फवारणी करता येते. यंत्राची बॅटरी चार्ज केली की, २ तास काम करता येते. यामध्ये बॅटरीची क्षमता आणखी वाढवता येऊ शकते. याबद्दल कुशवाह म्हणाले, "पारंपरिक बॅटरीवर चालणाऱ्या नॅपसॅक फवारणी पंपाच्या तुलनेत रोबोटिक फवारणी यंत्र किटकनाशकांच्या वापरात ५७ टक्के बचत करते. असा दावाही कुशवाह यांनी केला आहे. रोबोटिक फवारणी यंत्रात 'टेलेरोबोटिक टार्गेट-स्पेसिफिक सिलेक्टिव्ह पेस्टिसाइड ऍप्लिकेटर फॉर ग्रीनहाऊस आणि ओपन-फील्ड' नावाचं तंत्रज्ञान बसवण्यात आलेलं आहे.

Robotics
Tax on Robot : यंत्रमानवांवर कर आकारण्याचा इरादा

दरम्यान, ग्रीनहाऊसमध्ये फवारणी करताना अनेकांना विषबाधा होते. तसेच त्याचा शरीरांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा वापर करणं सोप्पं होईल, असं जाणकार सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com