Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : प्रतिलिटर ५ रुपये दूध अनुदानासाठी अर्जप्रक्रिया सुरू

Subsidy Application Process : राज्यातील सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्प, शितकरण केंद्रे व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आले आहे.

Team Agrowon

Nashik News : महाराष्ट्र शासनाने ५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा कालावधी ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी  केले.

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभाग संयुक्तरित्या या योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्प, शितकरण केंद्रे व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आले आहे.

प्राप्त अर्जांची छाननी करून प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी  लॉगिन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  

ईअरटॅगची कार्यवाही

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत प्रकल्पांसमवेत संयुक्तरित्या बैठक घेऊन योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना ईअरटॅग करण्याची कार्यवाहीसुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

तसेच या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी जनवारांचे ईअरटॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच दूधपुरवठा करत असणाऱ्या प्राथमिक सहकारी दूध संस्था, दूध संकलन केंद्र, शितकरण केंद्र यांच्याकडे आपला दैनदिन तसेच १० दिवसांचा तपशिल देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक विभाग श्री. र. शिरपूरकर यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT