Gokul Milk Subsidy : अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

Gokul Cow Milk : गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
Gokul Milk Subsidy
Gokul Milk Subsidyagrowon
Published on
Updated on

Kolhapur Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासह गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. हा दर राज्यातील दूध संघांकडून दिल्या जाणाऱ्या दरामध्ये उच्चांकी असल्याचेही डोंगळे यांनी नमूद केले.

डोंगळे म्हणाले, 'गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला आहे. लाखो दूध उत्पादकांच्या सहकायनि गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये सतत घसरण सुरू असून गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपयेपर्यंत कमी झाले आहेत. गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये इतका स्थिर ठेवला आहे.

यामध्ये राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे गोकुळकडून प्रतिलिटर दिले जाणारे ३३ रुपये आणि शासनाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान असे गोकुळला गाय दूध देणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये उच्चांकी दर मिळणार आहे.

Gokul Milk Subsidy
Kolhapur Sugarcane : महिलेची ऊस शेतीत क्रांती, एकरी १५० टन उत्पादन घेत मिळवला राज्य पुरस्कार

ते पुढे म्हणाले, 'राज्यातील खासगी व सहकारी दूध संघानी ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. करिता किमान प्रतिलिटर २७ रुपये दर देणे शासनाने बंधनकारक केले आहे. सध्या गोकुळचा गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. साठी प्रतिलिटर ३३ रुपये आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संकलित होणाऱ्या गाय दूध पैकी प्रतिदिनी जवळपास ७ लाख लिटर इतके दूध गोकुळकडून संकलित केले जात असून शासनाकडून मिळणारे पाच रुपये अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. या अनुदानापासून गोकुळ संलग्न कोणताही गाय दूध उत्पादक वंचित राहू नये, यासाठी गोकुळकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com