Pik Vima Application agrowon
ॲग्रो विशेष

Pik Vima Application : पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी ७२ तासात करावा लागतो अर्ज, अशी आहे पद्धत

sandeep Shirguppe

Maharashtra Farmer News : मागच्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी पीक विमा काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु यंदा सरकारने राबवलेल्या धोरणामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला मदत मिळण्यासाठी काही गोष्टींची तातडीने पूर्तता करावी लागणार आहे.

तुम्ही विमा उतरवलेल्या भागात नैसर्गिक आपत्तींने उदा. ढगफुटी, अतिवृष्टी, दीर्घकाळ पाणी साचून झालेल्या नुकसानीची माहिती वेळेवर पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत म्हणजेच नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत तक्रार केली तरच दखल घेतली जाते.

याचबरोबर कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करण्याचीही सुवीधा आहे. हा अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांनी स्वतःचे नाव, मोबाइल क्रमांक, अधिसूचित मंडळ, बँकेचे नाव, आपत्तीच प्रकार, बाधित पीक विमा भरल्याची पावती आदी माहिती काळजीपूर्वक भरून ते कृषी अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे.

नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आता पीक नुकसानीचा पंचनामा करणारी समिती, विमा कंपनी प्रतिनिधी, स्थानिक कृषी सहायक अधिकारी, तलाठी यांच्याकडे माहिती द्यावी. तसेच पीक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित केलेल्या अॅपवर ऑनलाइन तक्रार करता येते.

कोल्हापूरचे शेतकरी भारीच

राज्यात पीक विम्याचा बीड पॅटर्न प्रसिद्ध आहे. यंदाच्या खरीप हंगामात जवळपास ९ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला होता. दरम्यान बीडमध्ये बोगस पीक विमा भरलेले शेतकरी आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे संपूर्ण व महाराष्ट्रात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात चौकशी केली असता, यामध्ये एकही बोगस पीक विमा धारक सापडला नाही.

तालुकानिहाय पीक विमा काढलेले शेतकरी आजरा ५२३८, गगनबावडा २७८२, भुदरगड १९८० चंदगड ७४३२, गडहिंग्लज ६५४८, हातकणंगले ४३१६, कागल २८६० करवीर ६११०, पन्हाळा ३८५२, राधानगरी ८१०३ शाहूवाडी ३०७६, शिरोळ ३००४ असे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT