Gharkul Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Yojana : अपूर्ण घरकुले पूर्णत्वासाठी गावस्तरावर मेळावे घेण्याचे आवाहन

इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे कामकाज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आयुष प्रसाद बोलत होते.

Team Agrowon

Indapur News : ‘‘तालुक्यातील अपूर्ण घरकुल (Gharkul Scheme) असलेल्या लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत स्तरावर मेळावे घेऊन त्यांना घरकुले पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्‍यक सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या (indapur Panchyat Samiti) सभागृहात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे कामकाज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आयुष प्रसाद बोलत होते.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी तेजस जगताप यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, रोजगारसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले, की इंदापूर तालुक्यामध्ये एक हजारांहून अधिक घरकुलाचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झालेले असतानाही कामच सुरू केलेले नाही.

हा काम मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीअंतर्गत १००० पेक्षा जास्त घरकुले अपूर्ण आहेत. त्याबाबत उपाययोजना करून संबंधितांची घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे व आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर गृहप्रवेश उपक्रम राबवावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT