Tomato  Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Market : कुणीही या, टोमॅटो फुकट घेऊन जा

Tomato Rate : काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने बाजारात उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. मात्र आता अकलापूर (ता. संगमनेर) येथील गणेश आभाळे या तरुण शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.

Team Agrowon

Nagar News : काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने बाजारात उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. मात्र आता अकलापूर (ता. संगमनेर) येथील गणेश आभाळे या तरुण शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.

लागवडीचा खर्चही निघत नसल्याने अखेर या शेतकऱ्याने टोमॅटो तोडणे बंद केले आहे. ‘कुणीही या, आणि टोमॅटो फुकट घेऊन जा,’ अशी म्हणायची वेळ या तरुण शेतकऱ्यावर आली आहे.

अकलापूर येथील गणेश सीताराम आभाळे या तरुण शेतकऱ्याने टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून पहिल्यांदाच जवळपास एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली. खते, औषधे, मजुरी, डाम, काठी असा एकूण सत्तर हजार रुपयांवर खर्च आला. पहिल्याच तोड्यात ६० क्रेट टोमॅटो निघाले, मात्र प्रत्येक क्रेटला साठ रुपयांचा बाजारभाव मिळाला.

त्यामुळे वाहतुकीचा खर्चही अंगलट आला. सध्या टोमॅटो काढणीला आलेले असतानाही, केवळ बाजारभाव नसल्याने या तरुण शेतकऱ्याने टोमॅटो तोडण्याचे बंद केले. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाला होता म्हणून पहिल्यांदाच टोमॅटोचे पीक घेतले.

मात्र बाजारभाव कोसळले आणि टोमॅटोला कवडीमोल भाव मिळू लागला आहे. झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे. त्यामुळे कुणीही या टोमॅटो फुकट घेऊन जा असे गणेश यांनी लोकांना सांगितले.

पहिल्यांदाच टोमॅटोचे पीक घेतले. रात्रं-दिवस काम केल्याने टोमॅटोचा फडही अतिशय चांगला झाला. मात्र सोन्यासारख्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणेच बंद केले असून सर्वच खर्च अंगलट आला आहे. शेतकऱ्यांनी नक्की कोणते पीक घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- गणेश आभाळे, टोमॅटो उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात?

India EU FTA: भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करारावर चर्चा

Aaple Sarkar Portal: सात दाखले आता ‘आपले सरकार’वर मिळणार

Guava Farming: ‘सरदार पेरू’- शेतकऱ्यांचा विश्वासाचा साथी

Vegetable Cultivation: सांगलीत वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबली

SCROLL FOR NEXT