Anthracnose Karpa Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : द्राक्ष पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज करपा’

Anthracnose Karpa Disease : मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू (केवडा), पावडरी मिल्ड्यू (भुरी), ॲन्थ्रॅकनोज (करपा), जीवाणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

Grape Disease Update :

द्राक्ष पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज करपा’

महाराष्ट्रामध्ये द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात घेतली जाते. द्राक्षामध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू (केवडा), पावडरी मिल्ड्यू (भुरी), ॲन्थ्रॅकनोज (करपा), जीवाणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

लक्षणे

या रोगाची लक्षणे पाने, फांदी, फळ व फुलांच्या गुच्छावर दिसून येतात.

प्राथमिक प्रादुर्भाव नवीन पानांवर दिसून येतो.

रोगाचे ठिपके कमी जास्त प्रमाणात गोलाकार असतो. ठिपके २ ते ५ मिमी आकाराचे आणि तपकिरी रंगाचे असतात. सुरवातीला ठिपके छोटे असून नंतर वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. आणि संपूर्ण पान वाळते. ठिपक्यांमधील भाग वाळून गळून पडतो हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे.

फळांवर लाल ते तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके पडतात. ठिपक्यांची कडा गर्द तपकिरी किंवा काळी असून मधील भाग पांढरट राखेडी असतो. फळावरील ठिपका पक्षाच्या डोळ्याप्रमाणे दिसतो. आपल्या भागात शक्यतो फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही किंवा क्वचित जाणवतो. मागील वर्षी सांगली जिल्ह्यात रोगाचा प्रादुर्भाव फळांवर दिसून आला होता. परंतु रोग निर्माण करणारी बुरशी ही दुसऱ्या जातीची होती.

फांद्यांवर सुरवातीला तपकिरी काळसर रंगाचे बारीक ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन आतील भाग राखेडी होतो. ठिपक्याच्या ठिकाणी खड्डे पडलेले दिसतात.

रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो एप्रिल छाटणीमध्ये जास्त जाणवतो. तुलनेने ऑक्टोंबर छाटणीनंतर जास्त जाणवत नाही.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : ॲन्थ्रॅकनोज (करपा)

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीची डिव्हीजन : Ascomycota

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः इलसिनोइ अम्पेलीना (Elsinoe ampelina )

आढळ : सर्व द्राक्ष उत्पादक भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो.

नुकसान : रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे प्रत्यक्ष जास्त नुकसान होत नाही. परंतु वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा एप्रिल छाटणी नंतर पाने खराब होतो. त्यामुळे झाडातील कर्बोदकांवर परिणाम होऊन झाड अशक्त होण्याची शक्यता असते. आणि पुढील हंगामात जास्त परिणाम दिसून येतात.

यजमान पिके : आपल्याकडे फक्त द्राक्षावर या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो.

नियंत्रणाचे उपाय

बागेत हवा खेळती राहील असे नियोजन करावे.

कॅनोपी व्यवस्थित ठेवावी.

खतांचे योग्य व्यवस्थापन करावे. अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.

प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या वेळीच तोडून नष्ट करावीत.

बागेतील तण वेळीच काढावे.

रूट स्टॉकची वेळोवेळी पाहणी करावी. त्यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव असतो.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. हे बीजाणू दंड गोलाकार असतात. हे या बुरशीचे अलैंगिक बीजाणू असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाची बुरशी मागील वर्षीच्या जुन्या फांद्यांवर किंवा पानांवर स्युडोथेसीअम ( Pseudothecium) आणि स्क्लेरोशीया (sclerotia) तयार करून जिवंत राहतो. वातावरणातील आर्द्रता ८५ ते ९० टक्के आणि २२ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्युडोथेसीअम आणि स्केलेरोशीयामध्ये बीजाणू तयार होऊन प्राथमिक लागण होते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत रोग निर्माण होतो. रोग निर्माण झाल्यानंतर दिसणाऱ्या रोगाच्या ठिपक्यांमध्ये बिजाणूधानी (Acervuli) तयार होतात. या बिजाणूधानीमध्ये बीजाणू (Conidia) तयार होतात. आणि त्यांच्यामार्फत पुढील प्रसार होतो. याला दुय्यम लागण असे म्हणतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT