Sahyadri Farms  Agrowon
ॲग्रो विशेष

Sahyadri Farms : ‘सह्याद्री फार्म्स’ची वार्षिक उलाढाल १ हजार ७ कोटींवर

Sahyadri Farms Turnover : फलोत्पादन क्षेत्रात देशातील आघाडीवरील ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी‘ने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : फलोत्पादन क्षेत्रात देशातील आघाडीवरील ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी‘ने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षात कंपनीची १ हजार ७ कोटींची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृद्धी कंपनीने साधली आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी दिली.

‘सह्याद्री फार्म्स’ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. नाशिक जिल्ह्यात मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कार्यरत ‘सह्याद्री फार्म्स’ ही द्राक्ष उत्पादन व निर्यात तसेच टोमॅटो प्रक्रियेतील देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून पुढे आली आहे. कंपनीने मागील ७ वर्षांपासून हे स्थान सातत्याने टिकवून ठेवले आहे. व्यवसायात जागतिक दर्जाची प्रमाणके आणून

जागतिक द्राक्ष बाजारात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच ‘सह्याद्री‘ ही फलोत्पादनातील महत्वाची भारतीय कंपनी म्हणून ओळखली जात आहे. याशिवाय डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, स्वीटकॉर्न या पिकातही ‘सह्याद्री' काम करीत आहे. अशा विविध पिकांतील २४.५ हजार शेतकरी थेट कंपनीशी जोडले आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात २०१२ मध्ये १३ कोटी असलेली उलाढाल आता १ हजार कोटींवर पोचली आहे. ‘सह्याद्री’ला जोडून अन्य ४८ शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत. संलग्न २४. ५ हजार शेतकऱ्यांच्या ४० हजार एकर क्षेत्रातून येणाऱ्या २ लाख ७५ हजार ३२७ टन उत्पादनावर प्रक्रिया व निर्यात केली गेली.

याद्वारे निर्यातीतून सुमारे रुपये ३५२ कोटी उत्पन्न ,तर देशांतर्गत बाजारपेठेतून ६५५ कोटी उत्पन्न अशा प्रकारे एकूण १ हजार ७ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. यामध्ये ताज्या फळांची विक्री प्रमाण ५३ टक्के, तर प्रक्रियायुक्त उत्पादने प्रमाण ४७ टक्के आहे. कंपनीकडे एकूण ५६ कोटी रुपयांचे भागभांडवल राखीव निधी रुपये २५६ कोटी आहे.

शेतकऱ्यांच्या मालकीच्या या कंपनीने या बरोबरच ५५८ कोटींच्या पायाभूत सुविधा (मालमत्ता) उभारल्या आहेत. तसेच सुमारे १३०० पूर्णवेळ रोजगार व ४ हजार हंगामी रोजगार यातून निर्माण करण्यात कंपनीला यश आले आहे. १ हजार कोटींचा टप्पा शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीने पार पाडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांत आत्मविश्‍वास वाढला आहे.

सह्याद्री फार्म्सने एकूण शेतमालावर गत वर्षात केलेली प्रक्रिया : २, ७५, ३५७ टन

टोमॅटो प्रक्रिया...१,५०,२०० टन

द्राक्षे...४८,७०६ टन

आंबा...२६,२८० टन

केळी...२४,१०४ टन

स्वीट कॉर्न...५,३०० टन

इतर फळे...२०,००० टन

मागील १२ वर्षांपासून ही वाटचाल सुरु आहे. ती एका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. त्यातून एक आत्मविश्‍वासही प्राप्त झाला आहे. शेतीक्षेत्रात एकत्र येत निश्‍चित दिशा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांसह काम करायला वाव आहे. यातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ध्येयनिष्ठ युवा शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. फलोत्पादनातील मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT