Jain Irrigation Company Agrowon
ॲग्रो विशेष

Jain Irrigation : जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी

Jain Irrigation System Ltd : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीचे आणि वर्षअखेरीचे एकत्रित आर्थिक निकाल शनिवारी (ता. १८) जाहीर केले.

Team Agrowon

Jalgaon News : देशातील सर्वांत मोठी सिंचन प्रणाली कंपनी असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीचे आणि वर्षअखेरीचे एकत्रित आर्थिक निकाल शनिवारी (ता. १८) जाहीर केले. त्यात कंपनीच्या एकत्रित वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ झाली असून, ९१ कोटी रुपये नफा झाल्याचे दिसत आहे.

जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले. या वेळी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले, की भारतासह संपूर्ण जग हवामान बदलाला सामोरे जात असून, त्यामुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.

या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरीत्या कमी केला असून, किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले असून, कंपनीने चांगला नफा कमावला आहे.

चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य राहण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त केली आहे. सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे पहिल्या तिमाहीतील एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरूनही आम्ही गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यातून आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये :

वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ.

२०२४ या वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा (EBITDA) १६.८ टक्के वाढला.

चालू आर्थिक वर्षात एकत्रित करपश्‍चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो. गत वर्षी १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.

वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.

वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो रु. ५५.५ कोटी झाला.

हाती असलेल्या मागण्या :

सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटींच्या मागणी (ऑर्डर्स) आहेत. त्यात उच्च तंत्रज्ञानयुक्त कृषी निविष्ठा उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपये, प्लॅस्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया विभागाच्या १०७१ कोटी रुपये या मागणींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन

Gokul Dudh Sangh: डिबेंचर रक्कम कपातीचा मुद्दा, कोल्हापुरातील वातावरण तापलं, 'गोकुळ'समोर दूध उत्पादकांचे उपोषण

Crop Damage Compensation : ‘दौरे बंद करून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करा’

Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक

Nanded Rainfall : सरासरी १३९.०६ टक्के पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT