Jain Irrigation : जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

Irrigation : कंपनीचे तिमाही व सहामाही आर्थिक निकाल जाहीर
Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon

Jain Irrigation Profit : जळगाव ः भारतातील सर्वांत मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीने गुरुवारी (ता. ९) दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल मुंबई येथे कंपनी संचालक मंडळामध्ये जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या एकत्रित महसूल १,३६१.९ कोटी झाला.

म्हणजेच २५.९ टक्क्यांनी वाढ झाली असून, निव्वळ नफा ८.३ कोटी आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत महसूल १,०८२ कोटी होता, तर एकत्रित निव्वळ तोटा १९.५ कोटी रुपयांचा होता.

कंपनीने या सहामाहीत एकत्रित महसूल ३,०६३.० कोटी इतका नोंदविला असून, गतवर्षीच्या तुलनेमध्ये २२.६ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या सहामाहीत एकत्रित निव्वळ नफा ४४.९ कोटी असून, गेल्या वर्षी निव्वळ तोटा ७.७ कोटी रुपयांचा होता. सध्याही कंपनीच्या हातात चांगल्या ऑर्डर्स असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.


कंपनीच्या यशाविषयी आनंद व्यक्त करतानाच उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी पुढे सांगितले, की कंपनीच्या ३० सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाही व सहामाहीचे सकारात्मक आर्थिक निकालामागे कंपनीने बदललेली व्यावसायिक रणनीती आहे. कंपनीने प्रोजेक्ट व्यवसायाच्या तुलनेत किरकोळ व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हवामान विभागाच्या २०२३ च्या अहवालानुसार मॉन्सून सरासरीच्या ९४ टक्के झाल्याचाही कंपनीच्या व्यवसायाला लाभ झाला.

Drip Irrigation
Jain Irrigation : शेतकरी केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशनचे कार्य

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पावसाळा येत असल्याने शेतीविषयक कामे कमी असतात. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनी इतर तिमाहीपेक्षा कमी महसुलाची नोंद करते. असे असूनही कंपनीने एकल महसुलात गत वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ नोंदविलेली आहे. गत वर्षापेक्षा या वर्षी व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीचा नफा ४५ टक्के झालेला आहे.
प्लॅस्टिक व्यवसायात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत चांगली मागणी, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पाइप्स, टिश्युकल्चर आणि भारत आणि परदेशातील खाद्य व्यवसायात बाजारपेठेतील वाटा वाढलेला आहे.

देशांतर्गत व्यवसायातील भक्कम वाढ आणि उपकंपन्यांमधील चांगली कामगिरी यामुळे कंपनीला (२QFY२४) या तिमाही एकत्रित आधारावर महसुलात २५.९ टक्के वाढ आणि व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीच्या उत्पन्नामध्ये ५६ टक्के वाढ झाली. कंपनी आपले खेळते भांडवल चक्र (Working Capital Cycle) सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनी आपल्या उत्पादनातील नावीन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत पर्यावरणीय उपाय आणि किरकोळ व्यवसायावर आपले संपूर्ण भारतभर डीलर्स नेटवर्क विस्तारून लक्ष केंद्रित करत आहे.

पहिल्या सहामाहीच्या एकल आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये -
- एकूण महसुलात ३३.२ टक्क्यंची वाढ.(प्लॅस्टिक विभागासाठी किरकोळ आणि संस्थात्मक बाजारातील मजबूत मागणी)
- हाय-टेक ॲग्री विभागाला किरकोळ विक्रेत्यांकडून मिळालेल्या अधिक मागणीमुळे ६.६ टक्क्यांची वाढ.


- एकूणच प्लॅस्टिक विभागात (उदा. पीई पाइप्स, पीव्हीसी पाइप्स आणि प्लॅस्टिक शीट) सर्वांत उल्लेखनीय ८९.३ टक्के वाढ.
- कंपनीकडे एकूण ७९७.५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ॲग्रीसाठी - ३४४.८ कोटी, प्लॅस्टिक विभाग व इनपुट उत्पादनांसाठी ४५२.७ कोटी यांचा समावेश.

पहिल्या सहामाहीच्या एकत्रित आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये -
- एकूण महसुलात २२.६ टक्क्यांची वाढ.
- हाय-टेक ॲग्री विभाग ६.५ टकक्यांनी वाढला.
- पीई, पीव्हीसी पाइप प्लॅस्टिक विभागामध्ये ६२.५ टक्क्यांची लक्षणीय वाढ.
- भाजीपाला निर्जलीकरण विभागात वाढ

- भारतात १०.६ टक्के, तर विदेशातील व्यवसायात ९.६ टक्के वाढ.
- कंपनीकडे एकूण १,९९०.३ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ॲग्रीसाठी ३४४.८ कोटी, प्लॅस्टिक विभाग व इनपुट
उत्पादनांसाठी ४६६.० कोटी आणि कृषी विभाग १,१७९.५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com