Subsidy for Harbhara-Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Subsidy for Harbhara-Cotton: हरभरा-कापूस उत्पादकांसाठी विक्री अनुदान जाहीर करा

खुल्या बाजारात हरभरा विकल्यास एकट्या वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ३० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान होईल.

Team Agrowon

Wardha News : आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या तुलनेत कमी असलेले कापसाचे दर (Cotton Rate) त्यासोबतच शासनाने ऑस्ट्रेलियातून केलेली तीन लाख गाठींची निर्यात यामुळे कापसाचे दर दबावात आहेत. त्यासोबतच हरभऱ्याला देखील खुल्या बाजारात दर नाही.

याची दखल घेत कापूस व हरभरा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने दोन्ही पीक उत्पादकांना अनुदान जाहीर करावे, अशी मागणी हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी केली.

ॲड. कोठारी यांच्या मागणीनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक या मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये संततधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे कापूस उत्पादकता प्रभावित झाली. दुसरीकडे पंजाब, हरियाना व राजस्थान या छोट्या कापूस उत्पादक राज्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकतेवर परिणाम झाला.

गुजरात, तमिळनाडू, ओडिशा या राज्यांत कापसाचे उत्पादन समाधानकारक असले, तरी प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता घटली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाचे दर इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत अधिक आहेत.

त्यामुळे आयातदार देश भारताकडून माल घेणे टाळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुताला मागणी नाही. अशातच ऑस्ट्रेलियातून तीन लाख गाठी आयात करण्यात आल्या. सरकीच्या दरातही घसरण होत असल्यामुळे या सर्व बाबींचा कापसाच्या दरावर परिणाम झाला.

सद्यःस्थितीत कापसाला प्रतिक्‍विंटल ७००० ते ८००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दरात वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. त्याचा परिणाम कापड उद्योगावर झाले आहे. हा उद्योग बंद झाल्यास त्याचा रोजगारावर परिणाम होईल.

यासोबतच हरभऱ्याला देखील अपेक्षित दर नसल्याचे चित्र आहे. हरभऱ्याला हमीभाव ५३३५ रुपये असताना खुल्या बाजारात याचे व्यवहार ७०० ते ८०० रुपये कमी दराने होत आहेत.

खुल्या बाजारात हरभरा विकल्यास एकट्या वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ३० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान होईल. त्यामुळे शासनाने हरभरा आणि कापूस उत्पादकांसाठी प्रतिक्‍विंटल अनुदान जाहीर करावे, अशी मागणी ॲड. कोठारी यांनी केली.

यापूर्वी शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रतिक्‍विंटल २०० रुपये अनुदान दिले होते. बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री करण्यात येते. त्यामुळे व्यवहाराच्या कागदपत्रांची पडताळणी करून अनुदान वितरित करण्यात आले. त्याच धर्तीवर कापूस आणि हरभरा उत्पादकांसाठी निर्णय घेण्याची गरज आहे.
ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती हिंगणघाट, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT