Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Kaju MSP : अधिवेशनात काजू बीला हमीभाव जाहीर करा

Farmer Demand : उत्पादन कमी आणि काजू बीला दरदेखील कमी, यामुळे काजू उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात यावा.

Team Agrowon

Sindhudurg News : उत्पादन कमी आणि काजू बीला दरदेखील कमी, यामुळे काजू उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात यावा. अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा फळबागायतदार संघाने शासनाला दिला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत काजू लागवड असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलीकडील काही वर्षांत कोल्हापूर जिल्‍ह्यात चंदगड, आजरा या भागातदेखील काजू लागवड क्षेत्र वाढत आहे.

या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू बीवर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या वातावरणाचा फटका काजू पिकाला बसू लागला असून उत्पादनात घट होऊ लागली आहे.

उत्पादन कमी आणि दरदेखील कमी यामुळे काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गेले दोन-तीन वर्षे काजू उत्पादक काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सातत्याने काजू उत्पादकांची आंदोलने सुरू होती.

या आंदोलनांची दखल घेत शासनाने काजू बीला प्रतिकिलो दहा रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याकरिता ३०० कोटींची तरतूद केल्याचेदेखील स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडलेले नाही.

काजू बी हमीभावासह २० टक्के आयातशुल्क करावे, जाहीर केलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना द्यावे, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत आम्ही जिल्ह्यांतील शेतकरी संघटनांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत.
विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ सावंतवाडी-दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT