आस्तिककुमार पाण्डेय Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Virus : लम्पीपासून वाचण्यासाठी जनावरांचे तातडीने लसीकरण करुन घ्यावे ; आस्तिककुमार पाण्डेय

Lumpy Skin Disease : औरंगाबाद जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये आतापर्यंत 396 जनावरांना लम्पीची लागण (Lumpy Skin Disease) झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये आतापर्यंत ३९६ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

जिल्ह्यात एकूण गायवर्गीय पशुधन ५ लाख ३८ हजार ५७२ इतके असून, त्यापैकी ३९६ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख ६९ हजार ५२६ जनावरांचे म्हणजेच ६९ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.

लम्पी स्कीन आजाराची लक्षणे

लम्पी आजारामध्ये जनावरांना ताप येतो. चारा व पाणी कमी घेतले जाते किंवा बंद होते. नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते. अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

बाधित जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. बाधित जनावराबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयास सूचना द्यावी. जनावरांवर उपचार करून घ्यावेत. आजार नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधित गावापासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांतील चार महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी -विक्री थांबवावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhandardara Dam : भंडारदरा, निळवंडेतून विसर्ग घटवला

Rural Development : सहकारी संस्थांनी ग्रामीण उत्कर्षावर भर द्यावा

GST Council: जीएसटी सुधारणेसाठी मंत्रिगटाची मान्यता; जीएसटी परिषदेकडे लक्ष

Orange Cultivation : शास्त्रशुद्ध पद्धतीने संत्रा लागवडीवर भर द्या

BailJodi Decline: बैलांची संख्या का कमी झाली? दावणीवरच्या वैभवाचे भवितव्य काय ?

SCROLL FOR NEXT