Dairy Farmer protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : अकोले तहसील कार्यालयात सोडली जनावरे ; दूध उत्पादक आक्रमक

Ajit Nawale hunger Strike : राज्यात भरात दूध संघांकडून शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ आज दूध उत्पादकांनी अकोले तहसील कार्यालयात जनावरे सोडली.

Swapnil Shinde

Ahmednagar News : राज्यात दूध संघांकडून ३४ रुपयांची दूधाची खरेदी करण्याचा शासनाचा आदेश आहे. परंतू दूध संघांकडून शासन आदेश झुगारून शेतकऱ्यांना प्रति लिटर दूधासाठी २७ रुपये दिला जात आहे. सरकारने घेतलेल्या धोरणामुळे नाराज झालेल्या दूध उत्पादकांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले. अकोले तालुक्यातील दूध उत्पादकांनी तहसील कार्यालयात गायी सोडून शासनाचा निषेध केला.

दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली. त्यांच्या अहवालानुसार दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचे आदेश दुग्धविकास मंत्रालयाने काढले. मात्र विविध दूध संघांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुधाचे भाव पाडत दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर दिला जात आहेत.

या विरोधात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली. परंतु, सकारात्मक तोडगा निघू न शकल्याने दूध उत्पादकांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य ठिकठिकाणी शासन आदेशाची होळी करण्यात आली.

दूध दर, दूध भेसळ रोखण्यासाठी अकोले येथे उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी पाठिंबा दिला. तसेच कालपासून उपोषण सुरू केले. आज दूध दर आंदोलन तीव्र करत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात शेकडो जनावरे सोडली. या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

FRP Payment Issue: ‘विघ्नहर’वर ‘एफआरपी’साठी कारवाई करण्याची मागणी

Lasalgaon APMC: शेतीमाल विक्रीपश्चात तत्काळ ऑनलाइन पेमेंट

Rabi Sowing: पुणे विभागात रब्बी हंगामातील पेरणी ७८ टक्क्यांवर पोहोचली

Mango Kaju Crop: थंडीमुळे आंबा, काजू मोहरला

Maharashtra Cooperatives: सहकाराच्या मूळ संस्थांनाच दुय्यम स्थान

SCROLL FOR NEXT