Animal Vaccination Campaign Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination Campaign : कृषिकन्यांनी राबवली पशू लसीकरण मोहीम

Vaccination Update : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न देऊळगावराजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्राम उंबरखेड येथे पशू लसीकरण कार्यक्रम राबवला.

Team Agrowon

Buldhana News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न देऊळगावराजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्राम उंबरखेड येथे पशू लसीकरण कार्यक्रम राबवला.

या कार्यक्रमावेळी डॉ. अक्षय खरात यांनी जनावरांचे लसीकरण आणि जनावरांना होणाऱ्या विविध आजारापासून घ्यावयाची काळजीबाबत गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटून दिले. लसीकरण केल्यामुळे जनावरांचे आरोग्य कसे सुदृढ राहते व त्यामुळे पशुपालकांना कसा फायदा होऊन उत्पन्नात वाढ होते.

याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच जनावरांना होणाऱ्या रोगांबद्दल माहिती देऊन उपस्थित जनावरांना लम्पी आजाराची लस देण्यात आली. लम्पी आजाराचे दुष्परिणाम देखील या वेळी विशद करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रावेप्रभारी प्रा. मोहजितसिंह राजपूत तसेच पशुसंवर्धन विभागाचे प्रा. सचिन गोरे यांनी मार्गदर्शन केले. सायली सरनाईक, साक्षी काळे, हेमलता कुमरे, गायत्री नवलकर, समिक्षा गिरी, पूजा मांडवकर, गौरी देशमुख, प्रियदर्शनी राठोड, दीपाली मोरे, समिक्षा वैद्य, अर्पिता नागरे, श्रद्धा खर्डे, शर्वरी अतकरे, रुचिका अटोळे, कावेरी शंकदवार, श्रुती बाबर यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

SCROLL FOR NEXT