Chikungunya Vaccine : चिकुनगुनियावरील लस संसर्गजन्य आजार रोखते

Health News : चिकुनगुनियाविरोधात तयार करण्यात आलेल्या लसीचा केवळ एक डोस संसर्गजन्य आजारांविरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले आहे,
Chikungunya
Chikungunya Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : चिकुनगुनियाविरोधात तयार करण्यात आलेल्या लसीचा केवळ एक डोस संसर्गजन्य आजारांविरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे शरीरामध्ये तीव्र अशी प्रतिकारशक्ती तयार होते, असा दावा संशोधकांकडून करण्यात आला. या प्रतिबंधात्मक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष ‘दि लान्सेट जर्नल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Chikungunya
Health Problem : चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे जलजन्य आजाराची लागण

फ्रेंच बायोटेक कंपनी ‘वालनेव्हा’ने ‘व्हीएलए-१५५३’ ही लस तयार केली असून ही लस चिकुनगुनियानंतर मानवी शरीरामध्ये तयार होणाऱ्या इतर आजारांचा सामना कशा पद्धतीने करते? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. ज्या ठिकाणी चिकुनगुनिया हा एंडेमिक टप्प्यामध्ये पोचलेला नाही तिथे या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या नसल्याने त्याबाबत आताच निष्कर्ष काढता येणार नाही असे संशोधकांकडून सांगण्यात आले.

Chikungunya
Soil Health : जमीन चोपण किंवा चिबड का होते?

सध्या चिकुनगुनिया हा आजार आफ्रिका, आशिया हे खंड आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये एंडेमिक स्थितीमध्ये पोचला असल्याचे दिसून आले आहे. या विषाणूची बाधा झालेल्या डासाने चावा घेतल्यानंतर साधारणपणे चार ते आठ दिवसांमध्ये रुग्णाला ताप येऊ लागतो. डोकेदुखी अंगदुखी, मळमळणे आणि सांधेदुखी अशी लक्षणे त्याच्यामध्ये दिसू लागतात.

अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखी काही आठवड्यांपर्यंत राहू शकते. चिकुनगुनिया झाल्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते पण ज्येष्ठ नागरिक आणि नवजात अर्भकासाठी तो अधिक धोकादायक ठरू शकतो. या विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतीही मान्यताप्राप्त लस बाजारात उपलब्ध नाही तसेच त्याविरोधात अँटीव्हायरल उपचार पद्धतीदेखील उपलब्ध नाही.

सध्या ज्या देशांमध्ये हा आजार एंडेमिक स्थितीमध्ये पोचला आहे तेथील नागरिकांना तसेच त्या प्रदेशात जाणाऱ्या नागरिकांना या नव्या लसीचा मोठा लाभ होऊ शकतो. अनेक ठिकाणांवर या आजाराचा संभाव्य उद्रेक देखील टाळता येईल.
- मार्टिना श्नेईदेर, क्लिनिकल स्ट्रॅटेजी मॅनेजर वालनेव्हा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com