Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry In Sangli : सांगलीतील पशुपालकांना मिळणार चारा बियाणे

सांगली जिल्ह्यातील दुभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील दुभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २ हजार ८४९ शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ज्वारी आणि शेगव्याचे बिणाये वाटप केले जाणार आहे.

त्यासाठी २४ लाख ९९ हजार ४५० रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यातील दुभत्या जनावरांना चारा उपलब्ध सुधारणा कार्यक्रम योजना राबवली जाते. या कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता केली जाते. २०२२-२३ मध्ये २५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.

दुभत्या जनावरांना चारा उपलब्ध सुधारणा कार्यक्रमातून लाभार्थाला ज्वारीचे दोन किलो तर शेवग्याचे एक किलो बियाणे वाटप केले जाणार आहे.

त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पशुपालकांना जनावरांसाठी चारा बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाते. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात म्हैसाळ, टेंभू आणि ताकारीचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई नाही. चारा पिकास उपलब्ध पाणी असल्याने चाऱ्याची टंचाई भासणार नाही.

वास्तविक पाहता, चारा बियाणे हे जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना दिले जाते. परंतु मार्च महिना संपत आला असला तरी, अद्याप बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय लाभार्थी संख्या

तालुका - ज्वारी - शेगवा

मिरज- ३४०- १००

कवठे महांकाळ- १५०- ५५

जत - ३२० - ११०

आटपाडी- ११० - ४५

तासगाव- २४० - ७२

शिराळा- २८०- ९२

कडेगाव- १३० - ४२

विटा- १४० - ४२

वाळवा - ३४०- १००

पलूस - १०५ - ३६

एकूण- २१५५ - ६९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT