
Nashik News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे थंडावलेली लाळ खुरकूत लसीकरण मोहीम (Vaccination campaign) पुर्ववत सुरू झाली आहे.
या मोहिमेंतंर्गत जिल्ह्यातील पशुधनासाठी १० लाख ४ हजार ७०० लसमात्रा प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील पशुपालकांनी सर्व गायी, म्हशी, बैल, रेडे, तीन महिन्यांवरील वासरे, पारडे यांना लसीकरण करून घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण भारतात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गेल्या आठवड्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारला होता.तेव्हा हे लसीकरण रखडले होते.
मात्र,आता संप मागे घेतला गेल्याने लसीकरण पुर्ववत सुरु झाले आहे.जिल्ह्यात एकूण गाय वर्गीय व म्हैस वर्गीय पशुधन संख्या ११ लाख १६ हजार २८४ एवढी आहे.
जिल्ह्यातील गो व म्हैसवर्गीय पशुधनाचे विषाणुजन्य लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी लसमात्रा पशुवैद्यकीय संस्था स्तरावर वाटप करण्यात आलेल्या आहेत.
हा आजार पशूंसाठी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतो, तोंडात, पायात जखमा, ताप, गर्भपात, लहान वासरात मरतूक, उत्पादनात प्रचंड घट इ. परिणाम दृष्य स्वरूपात दिसतो. यामुळे पशूंचे व पर्यायाने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
लसीकरण थंड वेळेत करणे फायदेशीर असल्याने सर्व पशुपालकांनी याकरिता सजग राहून आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्यात येत आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यात ही मोहीम राबविली जात असून पशू पालकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. गर्जे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.