Ideal Village Agrowon
ॲग्रो विशेष

Ideal Village : आदर्श ग्राम निर्मितीसाठी एकात्मिक प्रयत्न गरजेचे : डॉ. नागरे

Dr. Prakash Nagare : शाश्वत शेतीसाठी आणि आदर्श ग्राम निर्मितीसाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Akola News : पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबिताना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत आहे.

तथापि शाश्वत शेतीसाठी आणि आदर्श ग्राम निर्मितीसाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष निवासी शिबिर सिंदखेड (मोरेश्वर) येथे होत असून उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या शिबिर उद्घाटनप्रसंगी सरपंच पंकज वानखेडे, पोलिस पाटील दुर्गा डांगे, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष आनंद वानखेडे, मुख्याध्यापिका सुषमा लांडे, ग्रामसेवक प्रशांत उचितकर, प्रयोगशील शेतकरी कल्याणी सोनोने, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. संदीप हाडोळे, कृषी महाविद्यालयचे विद्यार्थी आणि समस्त गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे, प्रा. डॉ. नारायण काळे, डॉ. मोहन तोटावार, डॉ. गिरीष जेऊघाले, डॉ. गणेश भगत, डॉ. प्रकाश कहाते, डॉ. योगिता सानप, डॉ. गोदावरी गायकवाड, डॉ. अरुणा काटोले आदी या शिबिरासाठी पुढाकार घेत आहेत. संपदा डोखे व मल्लिका ताजने यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT