Rural development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : ग्रामविकास, कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास

वडील वाबळे यांच्यासह नऊ भाऊ, तीन चुलते अशा ७० जणांचे मोठे कुटुंब. वडिलांचा दृष्टिकोन व्यापारी आणि सामाजिक. पदवीधर झाल्यानंतर दोन ट्रक घेऊन वाहतूक व्यवसायात पदार्पण केले.

Team Agrowon

वडील वाबळे यांच्यासह नऊ भाऊ, तीन चुलते अशा ७० जणांचे मोठे कुटुंब. वडिलांचा दृष्टिकोन व्यापारी आणि सामाजिक. पदवीधर (Graduate) झाल्यानंतर दोन ट्रक घेऊन वाहतूक व्यवसायात (business) पदार्पण केले. राज्यातले ज्येष्ठ नेते डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी ट्रक वाहतूक सोसायटीवर संचालक म्हणून बिनविरोध निवड केली.

आमदार आणि डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष आमदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवन सुरू झाले. आमदार प्रसाद तनपुरे यांच्या दूरदृष्टीतून खास बाब म्हणून चारशे एकर खरीप व चारशे एकर रब्बीसाठी उपसा जलसिंचन योजना राबविली.

गुहा गावातील पश्‍चिमेकडील जिरायती भागात दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. जिरायती शेती बेभरवशाची होती. शेतकऱ्यांना शेतमजूर म्हणून कामाला जावे लागत होते. हे चित्र बदलण्यासाठी २३ डिसेंबर २००२ मध्ये प्रेरणा विविध विकास कार्यकारी सोसायटी स्थापन केली. पीककर्ज वेळेवर उपलब्ध करून दिले.

पीककर्जाबरोबरच संकरित गायी खरेदी, गायींचे गोठे, ट्रॅक्टर, जेसीबी, शेतीतील हार्वेस्टर, सायफनसाठी कर्जपुरवठा केला. कृषी विभागाची ऑनलाइन तळे योजना विकास संस्थेने प्रेरणा पतसंस्थेचे सहकार्याने राबविली. सन २००५-०६ ला अनेक छोट्या अधिक उपसा जलसिंचन योजना प्रवरा उजव्या कालव्यावरून राबविल्या.

यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतून लिफ्ट योजना केल्या. कोळसे वस्ती, आंबेकर वस्तीवरील जिरायती, पडीक शेती बारमाही बागायती झाली. वीस वर्षांत वीस कोटी पेक्षाही अधिक कर्जपुरवठा विकास संस्थेने केला. सभासद व बँक पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली करीत आहे. त्याबद्दल जिल्हा सहकारी बँकेने संस्थेचा

गौरव केला. संस्था स्थापनेपासून सभासदांना लाभांश देत आहे. विकास संस्थेने रासायनिक खतांचा डेपो सुरू केला आहे. कीटकनाशके, बी-बियाणे विभाग सुरू केला आहे. एक एकर जागा खरेदी करीत असून, तेथे संस्था शेतकऱ्यांसाठी मॉल सुरू करीत आहे.

सोसायटीमार्फत वेअर हाउस उभारण्याची योजना आहे. गोल्ड लोनच्या धर्तीवर शेतीमाल तारण योजना राबवण्याची योजना आहे. ‘प्रेरणा’मुळे गावात कृषी क्रांती, श्‍वेत क्रांती, अर्थक्रांती झाली. शेतीच्या प्रगतीला गती मिळाली. आमच्या नेतृत्वाकडून मी दूरदृष्टी, आर्थिक शिस्त शिकलो. विकास संस्थेमार्फत तळागाळातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला पैसा कसा उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले.

सन २०१९ मध्ये साई प्रेरणा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी सुरू केली. फॉर्मर्स कंपनीच्या कृषिसेवा केंद्राचा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच शुभारंभ केला. खते, बी-बियाणे तेथे विक्री केले जातात. फार्मर्स क्लबचे तीनशे सदस्य आहेत. आगामी काळात शेतीमाल प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करण्याची योजना आहे.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उपलब्ध व्हावी असाही प्रयत्न आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रतवारी, पॅकिंग, फॉरवर्डिंग अशा स्वरूपाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची ही आमची योजना आहे. प्रेरणा विकास संस्थेमुळे शेती अमूलाग्र बदलली.

पीक पद्धतीत बदल झाला. कोरडवाहू शेती भरवशाची, फायद्याची, अधिक उत्पन्न देणारी झाली. डाळिंब, पपई, आंबा अशा फळ पिकांबरोबरच सोयाबीन, कांदा, ऊस, मका आदींचा पीक पद्धतीत समावेश वाढला.वीस वर्षांपूर्वी पाचशे लिटर दूधसंकलन होते. आज २७ हजार लिटर दूध संकलन होत आहे. अनेक चिलिंग प्लान्ट उभे राहिले

विकास संस्थेत रोजगारनिर्मिती फारशी नसेल, परंतु रोजगार देणारे अनेक उद्योजक संस्थेने निर्माण केले. अनेक छोटे व्यावसायिक, कापड, किराणा, वेल्डिंग, फिटर ऑटोमोबाईल, हॉटेल असे व्यावसायिक, दूधसंकलन केंद्र, चिलिंग प्लांट आदी उद्योजक, व्यावसायिक निर्माण झाले. एसी पोल्ट्री फार्मसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्जपुरवठा केला. गावात आज ५५ ते ६० ट्रॅक्टर आहेत. त्यातून ऊस वाहतूक व्यवसाय स्थिरावला.

शेतीमाल वाहतुकीसाठी ॲपे रिक्षा, टेम्पो यांची २०० पेक्षाही संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतीमाल वाहतुकीची एक वेगळी व्यवस्था उभी राहिली. व्यावसायिकतेला, उद्योगाला गती देण्याचे काम प्रेरणासंस्थेने केले. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांचा देखील मोठा विकास ‘प्रेरणा’मुळे झाला आहे जिरायती शेती बागायती झाली पैसा आणि पाणी याचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात आले. आज ६५ टक्के शेती बागायती झाली आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, गावातील समृद्धीचा आधार ‘प्रेरणा ब्रॅण्ड’ झाला आहे.

सुरेश वाबळे ९४२२२२५९७१

सामाजिक उपक्रम

केवळ आर्थिक विकासालाच प्राधान्य न देता सामाजिक बांधिलकीतून संस्थेने अनेक उपक्रम परिसरात राबवले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपणाकडे अधिक लक्ष दिले आहे. गुहा, तांभेरे, तांदूळनेर येथील वृक्षरोपणाचे ऑडिट केले जाणार आहे. कोरोना काळात उपचारार्थ एका तासात एक लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले.

त्याचा गरजूंना लाभ झाला. ७० शेतमजुरांना ५० हजार रुपये सामूहिक विवाहासाठी कर्ज दिले. कोरोना काळातच गरजूंना अन्नधान्य किराणा सामानाचे किट वाटले. अपघात, सर्पदंश अशा उपचारांसाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले. कर्मचारी विमा योजना राबवण्यात आली असली, तरी आगामी काळात कर्जदारांनाही अपघाती मृत्यू बरोबरच नैसर्गिक मृत्यू आला तरीही त्यांच्यासाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाणार आहे.

पाणलोट क्षेत्रात पाणी आडवा व पाणी जिरवा ही मोहीम राबवली. दुष्काळात टँकरने पाणीपुरवठा केला. गावात साईकृपा सार्वजनिक वाचनालय चालवले जात असून, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. त्याचा अनेकांना लाभ झाला असून, शासकीय व बँकिंगमध्ये निवड झाली आहे. प्रेरणा हा कृषी उद्योजकतेचा मोठा ब्रँड झाला आहे. याचे समाधान हे पुरस्काराइतकेच मोठे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT