Rural Development : माय मातीचा पर्यावरण, शैक्षणिक जागर

धामणगाव (ता.जि. जळगाव) येथील माय माती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने ग्रामीण भागात पर्यावरण जनजागृतीसह स्वच्छता व शैक्षणिक विकासासंबंधी प्रभावीपणे काम केले आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrrowon

धामणगाव (ता. जि. जळगाव) येथे माय माती फाउंडेशन (My Mati Foundation) चार वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना प्रभावती सुहास पाटील यांनी केली. सध्या वत्सला पाटील या संस्थेच्या अध्यक्षा आहे. प्रभावती यांचे माहेर धामणगावचे.

Rural Development
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

लग्नानंतर त्या वीस वर्षे मुंबईत होत्या. पती सुहास यांची जळगावी बदली झाली. यामुळे त्या धामणगावनजीक आल्या. पुस्तक वाचन, पुस्तक संग्रहाची प्रभावती यांना आवड आहे. यातून ज्ञान, मार्गदर्शन मिळाले. या ज्ञानाचा आपले गाव, आपल्या परिसरासाठी उपयोग व्हावा, गावात महिलांमध्ये शैक्षणिक, आरोग्यविषयक जनजागृती व्हावी यासाठी प्रभावती यांनी माय माती फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या कार्याला चालना मिळाली. यासाठी पती सुहास यांची मोलाची मदत, मार्गदर्शन असते.

स्वच्छ गाव संकल्पनेला चालना

जळगाव तालुक्यातील धामणगाव, आवार आणि लोंढवे (ता. अमळनेर) गावांमध्ये संस्थेने आपल्या कामाला सुरुवात केली. याच गावात अनेक उपक्रम आवश्यकतेनुसार घेतले जातात. धामणगाव येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने पर्यावरण, शैक्षणिक उपक्रम सुरू झाले. गावात काम करताना आरोग्यविषय समस्या दिसून आल्या.

Rural Development
Environment : पैशांची भाषा आणि झाडांचे संवर्धन

त्यात गावातील वैयक्तिक शौचालयांचा कमी वापर हा मुख्य मुद्दा समोर आला. घरात शौचालय असताना देखील त्याचा उपयोग का केला जात नाही, याचा अभ्यास केला. गावात उघड्यावरील हागणदारीची समस्या कायम होती. गावात काही जणांकडे शौचालय नव्हते. यात ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांच्यासाठी गावात चांगल्या दर्जाचे तसेच पाणी, विजेची व्यवस्था असलेले शौचालय उभारण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याकडे संस्थेने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश आले आणि गावात सार्वजनिक शौचालय मंजूर झाले. ज्यांच्याकडे शौचालय आहे, त्यांना त्याचा वापर करण्यासंबंधी त्यांचे पाल्य, विद्यार्थी यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शाळेत वेळोवेळी पत्रलेखन व सूचना उपक्रम राबविण्यात येत आहे.

कायदेविषयक शिबिर

ग्रामीण भागात देशातील कायदे, संविधान याबाबत आदर आहे, पण मूलभूत बाबींची माहिती महिला व इतरांना नसते. ही बाब लक्षात घेता धामणगाव तसेच इतर भागात कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले. कोरोना पूर्वीच्या काळात या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

यातून महिलांचे अधिकार, त्यांना उपयोगात येणारे कायदे, आपले कर्तव्य याची माहिती देण्यात आली. जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. महिलांसाठी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाही घेतली जाते. यात प्रथम तीन महिलांना रोख बक्षीस दिले जाते. सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय आदी विषयांवर या स्पर्धा घेतल्या जातात.

Rural Development
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका

संस्थेने लोंढवे, धामणगाव येथे स्पर्धा परीक्षा, पोलिस, सैन्य भरती व इतर शासकीय नोकरीविषयक परीक्षेसंबंधी अभ्यासिका उभारली आहे. लोंढवे येथील माध्यमिक विद्यालयाने मदत करून एक वर्ग त्यासाठी उपलब्ध करून दिला. धामणगाव येथे ग्रामपंचायतीने समाज मंदिराची जागा उपलब्ध करून दिली.

लोंढवे येथे अभ्यासिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी पुस्तके, स्टडी टेबलची सुविधा आहे. दर १५ ते २० दिवसांनी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन वर्ग घेतला जातो. सध्या ६० विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. धामणगाव येथील अभ्यासिकेला कमी प्रतिसाद मिळाल्याने अभ्यासिकेचे रूपांतर बाल संस्कार वर्गात करण्यात आले.

Rural Development
Onion Rate : बुरशीमुळे कांदारोप संकटात

या वर्गात दर आठवड्यातून एकदा शिबिर, मार्गदर्शन वर्ग घेतला जातो. यामध्ये प्रभावती व सुहास हे मार्गदर्शन करतात. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, स्वच्छतेचा संस्कार रुजावा याबाबतची माहिती दिली जाते. यासाठी यू-ट्यूब चॅनेल आणि इतर डिजिटल साधनांचा उपयोग केला जातो.

संस्थेचे आगामी नियोजन

आवार गावात ग्रामपंचायतीच्या मदतीने ५० गुंठे जमिनीवर वृक्षारोपण.

धामणगाव १०० टक्के हगणदरीमुक्त उपक्रमासाठी प्रभावीपणे काम करणार.

धामणगाव येथे मुख्य रस्ता, चौकांचे सुशोभीकरणाचे नियोजन.

बांधावर वृक्ष लागवड वाढविण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन.

विविध गावांत सार्वजनिक शौचालय आणि व्यक्तिगत शौचालयासंबंधी जनजागृती. यासाठी जिल्हा परिषदेच्या यंत्रणांना सहकार्य. परिसरातील दहा गावात बाल संस्कार केंद्र, बाल वाचन कट्याचे नियोजन.

युवकांसाठी माझे गाव -माझी जबाबदारी उपक्रमाचे नियोजन.

Rural Development
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

वृक्षारोपणाचा उपक्रम

संस्था दरवर्षी शेकडो रोपांची लागवड करते. तसेच जगविण्यावरही लक्ष ठेवले जाते. रोप लागवड केली की आपली जबाबदारी संपली, असे न करता जेथे रोप दिले, त्यांना त्याचे संवर्धन करण्यासाठी ट्री गार्ड दिले जाते. कुणी किती रोपे चांगली वाढविली, याची दखल घेतली जाते. संस्थेने मध्यंतरी चांगली रोपे जगविणाऱ्या १४ महिलांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

रोपवाटिका निर्मिती : संस्था दरवर्षी विविध गावांमध्ये वृक्षारोपण करते. या उपक्रमासाठी काहीवेळा रोपे उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन धामणगाव येथे संस्थेने तापी रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेतून मोफत रोपे लागवडीसाठी दिली जातात. या रोपवाटिकेचा कुठलाही व्यावसायिक उपयोग केला जात नाही. दरवर्षी या रोपवाटिकेतून शेकडो रोपे ग्रामस्थ, गरजवंतांना दिली जातात.

फर्निचर किंवा घरगुती कामासाठी उपयोगात येणार नाही, अशा वृक्षांची रोपे या रोपवाटिकेत उपलब्ध असतात. विशेषतः वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, जांभळाची रोपे अधिक असतात. संस्थेने या रोपवाटिकेतील शेकडो वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com