Team Agrowon
कवी- इंद्रजीत भालेराव
किती नीटस निखळ तुझं कुंकवाच लेणंकुंकू कोरणारा हात चंद्र पाहतो चोरून
चिमुकल्या आरशात फक्त कपाळ दर्शन तुला कुठं हवी आहे सौंदर्याची खुलवण
तुझ्या कुंकवाचा मांड कसा कपाळ भरून अवकाळ अवदसा जाती पळून दुरून
जसा उगवता सूर्य तुझ्या भाळावरी आला त्याचा फाकला प्रकाश भोवताल उजळला
तुझा असा शिनगार मीही पाहतो चोरून कवितेत प्रतिमेत तुला ठेवीतो कोरून
- इंद्रजित भालेराव