Mahavikas Aghadi Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavikas Aghadi : जागांबाबत ‘माविआ’ची बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत

Team Agrowon

Mumbai News : महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र त्याबाबत बुधवारच्या (ता. ६ ) बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. बैठकीनंतर आंबेडकर यांनी माध्यमांशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. तसेच ‘पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील,’ अशी सूचक प्रतिक्रिया श्री. आंबेडकर यांनी दिली.

आंबेडकर म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही, याचे ब्रिफिंग वरून होईल. पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील.’’ त्यावर पत्रकारांची बैठक सकारात्मक होती का? या प्रश्नावर ‘‘माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते,’’ असा उलटा सवाल त्यांनी केला. तेव्हा बाजूला असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी ‘सकारात्मक’ असे म्हटले. त्याचवेळी आंबेडकर हासले. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘माविआ’च्या बैठकीत ४८ जागांवर सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया दिली. ‘मविआ’ची पुढची बैठक शनिवारी (ता. ९) होईल, असे समजते.

अमित शाह यांची शिंदेंशी चर्चा

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील तब्बल १८ जागांवर शिंदे सेनेने आणि १० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केल्याचे समजते. या मित्रांना नाराज न करता भाजपने अधिक जागा जिंकणे फायद्याचे असल्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली.

मित्रपक्षांनी केलेले दावे अवाजवी असून, त्यामुळे सुमारे १५ जागांबाबत तिढा निर्माण झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. अमित शहा यांनी मुंबई विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कुठे भेटायचे याचे निर्देश दिले.

त्यानंतर लगेचच या संबंधातल्या बैठका सुरू झाल्या. बारामती लोकसभा मतदार संघावर अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अन्य जागांवरही प्रारंभिक चर्चा झाल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT