Irrigation Department Agrowon
ॲग्रो विशेष

Dudhganga Irrigation : दूधगंगा प्रकल्पातील पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

Irriagation Department Update : दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी, बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी पाणी वापर संस्थानी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : दूधगंगा धरणाच्या गळती प्रतिबंधक कामास शासनामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी, बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी पाणी वापर संस्थानी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले.

रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता पिकांची निवड करताना पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करावी.

तसेच ऊस पिकाची निवड करताना नदीच्या लाभक्षेत्रात नेहमीप्रमाणे लागण करून दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, तसेच मागील वर्षीपेक्षा जास्त उसाची लागण करू नये जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे (उत्तर) उप कार्यकारी अभियंता यांनी केले.

दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी, बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी पाणी वापर संस्थानी दूधगंगा धरणाचा एकूण पाणीसाठा क्षमता २५.४० टीएमसी असून मागील वर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीच्या पार्श्‍वभूमीवर तो २०.५४ टीएमसी करण्यात आला होता.

मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीत जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने हा पाणीसाठा सिंचनासाठी अपूरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ टीएमसी करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत आवर्तन सुरू असून सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार?

E-Peek Pahani : शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीची कसरत

Agrowon Podcast: हरभरा बाजारभाव स्थिर; वांगी व लसणाचे दर टिकून, हळदीची मागणी कायम तर उडदाचा भाव दबावात

Rabi Jowar: चांगले उत्पादन देणारे रब्बी ज्वारीचे चार वाण

Banana Cluster : ‘बनाना क्लस्टर’मध्ये गुंतवणुकीची संधी

SCROLL FOR NEXT