Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा सर्व्हर डाऊन; लाडक्या बहीणांचा त्रास काही थांबेना

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. तसेच या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात याची घोषणा करताना १ जुलैपासून सुरू होत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याच्या कानाकोपऱ्यात योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांचा गोंधळ उडाला आहे. विविध जिल्ह्यात महिलांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर विविध जिल्ह्यांमध्ये योजनेचा सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवताना लाडक्या बहीणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्य सरकराच्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात हजारो महिलांची तहसीलमधील सेतू कार्यालयात तुडुंब गर्दी होत आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची आरेरावी होत असल्याचे उघड होत आहे. तर कुठे कुठे पैसे मागितले जात आहेत.

यादरम्यान अमरावती, जळगाव, सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे सकाळी लवकर येऊन देखील महिलांना तासनतास सेतू बाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. तसेच अर्ज भरला जात नसल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात असून संताप देखील व्यक्त केला जात आहे.

यादरम्यान या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना घेता यावा यासाठी राज्य सरकारने ७ बदल केले आहेत. या बदलामध्ये वयात बदल करताना ६५ वय करण्यात आले आहे. तर अर्ज करण्याची मुदत वाढ करण्यात आली असून ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढण्यात आली आहे. तसेच ५ एकर शेत जमिनीची अट वगळ्यात आली आहे. तर २.५ लाखांच्या उत्पन्न दाखल्याबाबत बदल करत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशांना यात सुट देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT