Amravati Zilha Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Zilha Bank : अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा

District Bank Update : जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी आपले राजीनामे सादर केलेत.

Team Agrowon

Amravati Bank News : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी आपले राजीनामे सादर केलेत.

आज (ता.२१) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. राजकीय ‘अ‍ॅडजेस्टमेंट’मधून अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे.

२०२१ मध्ये जिल्हा बँकेच्या नवीन संचालक मंडळाची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली होती. त्या वेळी तत्कालीन पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या पॅनेल विरोधात आमदार बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या पॅनेलसोबत लढत झाली होती.

बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनेलने १२ जागा मिळविता बँकेवर आपला झेंडा रोवला होता. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली. मात्र निवडून आलेल्या पॅनेलमधील इच्छुकांना अध्यक्ष तथा उपाध्यक्षपद भूषविता यावे, दीड वर्षांचा कार्यकाळ निर्धारित केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी राजीनामे सादर केले आहेत.

जिल्हा बँकेत सहकार पॅनेलची सत्ता असून, दीड वर्षाच्या कालावधीसाठी मला बँकेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी वरिष्ठांकडून देण्यात आली. आता दीड वर्षाचा कालावधी संपल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार आपला राजीनामा दिला आहे. गुरुवारी (ता.२२) होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तो मंजूर करण्यात येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सहकार विभागाकडून राबविली जाईल.
सुधाकर भारसाकळे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT