Attack  Agrowon
ॲग्रो विशेष

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचा अमरावती काँग्रेसकडून निषेध

Congress News : आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थानावेळी वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा शहर काँग्रेस समितीने तीव्र निषेध केला आहे.

Team Agrowon

Amravati News : आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थानावेळी वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा शहर काँग्रेस समितीने तीव्र निषेध केला आहे. येथील राजकमल चौक येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस समितीने निषेध आंदोलन करीत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

वारकऱ्यांवर लाठीचार्ज ही महाराष्ट्राच्या इतिहासातील लाजीरवाणी घटना असून कालचा दिवस काळा दिवस होता, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

रविवारी (ता.११) रात्री आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. यादरम्यान वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. ही घटना क्लेशदायक असून वारीच्या आजवरच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही, ती हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारच्या काळात घडली, असा आरोप करीत शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर (जिल्हा) अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या नेतृत्वात राजकमल चौक अमरावती येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधी घोषणा देत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा शहर काँग्रेसच्या वतीने मागण्यात आला.

याप्रसंगी संजय वाघ, अभिनंदन पेंढारी, मुन्ना राठोड, प्रा. सुनील कांडलकर, सुनील जावरे, गोपाल धर्माळे, गजानन जाधव, प्रदीप अरबट, शोभा शिंदे, योगीता गिरासे, देवयानी कुर्वे, वंदना थोरात, आशा अघम, अपर्णा मकेश्वर, मनीषा मनोहरे, सुरेंद्र देशमुख, रवींद्र शिंदे, नीलेश गुहे, वैभव देशमुख, समीर जवंजाळ, योगेश बुंदेले, संकेत साहू, गजानन राजगुरे, पंकज मांडळे, गजानन इंगोले, निर्मल अहरवार, सुजल इंगळे, अमर देशकर, मोहन पुरोहित, निखिल बिजवे, विजय खंडारे, अनिल देशमुख, अनिल तायडे, अरुण बनारसे, अतुल काळबेंडे यांच्यासहकाँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वारकरी परंपरा ही अत्यंत प्राचीन आहे. या परंपरेला आजपर्यंत कधीही गालबोट लागले नाही, पहिल्यांदाच इतिहासात त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पाप असून ते त्यांना भोगावे लागणार आहे.

स्वयंशिस्त वारकरी परंपरेला ज्या लोकांनी गालबोट लावलेले आहे त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. त्यांचे बेगडी हिंदुत्व या घटनेमुळे उघड पडले आहे.- डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT