Ashadhi Wari 2023 : विठु रायाच्या नामात 'G-20'चे परदेशी पाहुणे दंग

Team Agrowon

आषाढी वारी

आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

पुण्यनगरीत पालखी सोहळा

लाखोंच्या संख्येने वारकरी या दोन्ही पालख्यांमध्ये पायी वारीसाठी सामील झाले आहेत. या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीमध्ये जोरदार स्वागत झाले.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

G-20 परिषद

दरम्यान, G-20 परिषदेच्या 'डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट' बैठकीसाठी देश विदेशातील प्रतिनिधी सध्या पुण्यात आले आहेत.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

परदेशी पाहुणे

G-20 च्या प्रतिनिधींनाही पालखी सोहळ्यात आपली हजेरी लावत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

वारकरी वेशात G-20 प्रतिनिधी

ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे आणि टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

विठुच्या नामाचा जयघोष

डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महिला प्रतिनिधींनी ठेका धरला. तर पुरष प्रतिनीधींही गळ्यात उपरणे आणि डोक्यावर टोपी घालत विठुच्या नाम गजरात दंग झाले.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

परदेशी महिला फुगडीत दंग

ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

पालखीचे क्षण मोबाईलमध्ये कैद

G-20 च्या प्रतिनिधींना पालखी सोहळ्याचे क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनावर झाला. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पालखी सोहळ्याची छबी कैद केली.

Ashadhi Wari 2023 | Agrowon
Ashadhi Wari 2023 | Rupali Chakankar