Cotton Growers Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Growers : अमरावतीमध्ये कापूस जाळून शासनाचा निषेध ; जिल्हा कचेरीसमोर सर्वपक्षीय आंदोलन

Cotton Rate : शेतकऱ्यांची व्यथा शासनाने समजून घ्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कापूस पेटवून आपला रोष व्यक्त केला.

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः शेतकऱ्यांची व्यथा शासनाने समजून घ्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कापूस पेटवून आपला रोष व्यक्त केला. शासकीय धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात निर्यातीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाला अत्यल्प भाव देण्यात येत आहे. हीच परिस्थिती सोयाबीनची सुद्धा आहे. त्यामुळे शेतकरी चारही बाजूंनी संकटात घेरलेले आहेत. मात्र दुसरीकडे शासनाकडून शेतकऱ्यांकडे डोळेझाक केली जात आहे, असा आरोप शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी केला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार, तर कापसाला १० हजार रुपये भाव द्या, जाहीर केल्यानुसार शेतीमालासाठी भावांतर योजना लागू करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध पक्षांतील शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कापसाची होळी पेटविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात प्रकाश साबळे, संजय कोल्हे, जगदीश बोंडे, छोटू महाराज वसू, समीर जवंजाळ, अॅड. नंदेश अंबाडकर, प्रवीण कोल्हे,

अतुल ढोके, जयकुमार फुटाणे, गजानन खेडकर, दिलीप केने, मुरलीधर डाहाणे, वासुदेव कळस्कर, दादासाहेब कडू, साहेबराव इंगळे, सूर्यभान नांदणे, मंगेश दिवाण, सतीश दिवाण, दिगंबर भगत, मंगेश धोटे, सुनील शेरेवार, राजाभाऊ देशमुख, अरुण देशमुख, अशोक चौधरी, विजय सवई, पौर्णिमा सवाई, दिलीप कडू, संजय वडूरकर, कृष्णराव पाटील, अजय देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनातील संताप, खदखद बाहेर आली आहे. आता तरी शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जावे, अशी अपेक्षा आहे.
- प्रकाश साबळे, समन्वयक, शेतकरी कृती समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BJP Mahayuti Victory : ...हा तर विक्रमी जनादेश, महाराष्ट्राचा पंतप्रधान मोदींवर विश्वास- फडणवीस

Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल

Nano Fertilizers: शाश्वत शेतीसाठी नॅनो खतांचा वापर गरजेचा

Kidney Sale: किडनी घेता का कुणी किडनी..?

SCROLL FOR NEXT