Nagar Lok Sabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Nilesh Lanke : लोकसभा निवडणूकीतही नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विखे यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळला आहे.

Team Agrowon

Nagar News : लोकसभा निवडणूकीतही नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विखे यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळला आहे. पायाखालची वाळू सरकल्यानेच त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात नीलेश साहेबराव लंके यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. या उमेदवाराला विखे कुटूंबाकडून उभे केल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता.२७ ) महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विखे कुटुंबावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, आपचे संघटक सुभाष केकाण उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या वतीने बोलताना राजेंद्र फाळके म्हणाले, ‘‘विखे हे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबात त्यांच्या सख्ख्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

नावातील साधर्म्य पाहून दिशाभूल करण्यासाठी डमी अर्ज दाखल केला असल्याचा आरोप फाळके यांनी केला. निघोजच्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सुधारीत मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर नीलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. विखे कुटुंब नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबलेले दिसते असे फाळके म्हणाले.

‘आमच्याकडेही डमी उमेदवार होते’

राजेंद्र फाळके म्हणाले, ‘‘आमच्याकडेही सुजय रमाकांत विखे व सुजय दिगंबर विखे हे दोन जण आले होते. आमचेही डमी अर्ज दाखल करा असे त्यांचे म्हणणे होते. मात्र आम्ही स्वारस्य नसल्याचे सांगत नकार दिला. आम्हाला कोणतीही भीती नाही. मात्र डमी नावाने गैरवापर नको म्हणून ही बाब आम्ही माध्यमांपुढे मांडली. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढवून आचारसंहितेचे काटेकोर पालन महाविकास आघाडीकडून केले जाईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Scheme : कृषी समृद्धी योजनेंतर्गत ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि बीबीएफ यंत्रासाठी मिळणार अनुदान; शासन निर्णय जारी

Hawaman Andaj : राज्यात थंडीची चाहूल; काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही वाढला

Paddy Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व ४० टक्के भातपिकाचे नुकसान

Fallow Land Sowing: नापेर क्षेत्रात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी 

Manoj Jarange Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे पृथ्वीतलावावर नसावा, असं जरांगेंना वाटतं, मुंडेंचे प्रत्युत्तर, सीबीआय चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT