Maharashtra Election Lok Sabha : महाराष्ट्रात अत्यंत कमी मतदान, नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडले

Lok Sabha 2024 : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे.
Maharashtra Election Lok Sabha
Maharashtra Election Lok Sabhaagrowon

Lok Sabha Election Maharashtra : लोकसभेचा देशभरात मतदानाचा दुसरा टप्प्यासाठी मतदान होत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे.

विदर्भातील ५ आणि मराठवाड्यातील ३ जागांवर मतदान होत असून दिवसभरात अत्यंत संथ गतीने मतदान झाले आहे. दिवसभरात ८ मतदार संघात ४५ टक्क्यांपेक्षाही कमी मतदानाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के इतके मतदान झाले. याबाबतची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. मागच्या ८ दिवसांपूर्वी विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघातही ५० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. महाराष्ट्रासह १३ राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्पा पार पडत आहे.

महाराष्ट्रात झालेले मतदान

वर्धा- ४५.९५ टक्के, अकोला- ४२.६९ टक्के, अमरावती- ४३.७६ टक्के, बुलढाणा- ४१.६६ टक्के, हिंगोली- ४०.५० टक्के, नांदेड- ४२.४२ टक्के, परभणी- ४४.४९ टक्के, यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के या लोकसभा मतदारसंघात मिळून फक्त ४३.०१ मतदान झाले आहे.

Maharashtra Election Lok Sabha
Maharashtra Fodder Shortage : राज्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकंती; चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण, सरकार करतयं तरी काय?

अमरावतीत शांततेत मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.२६) मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी मशीनमध्ये झालेले बिघाड तसेच अन्य कारणांनी मतदानाला उशीर झाला असला तरी नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. ढगाळ वातावरण व काल काही प्रमाणात आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने सकाळच्या वेळी मतदानाने चांगलाच वेग घेतला होता.

३७ उमेदवार अमरावतीच्या रिंगणात असून तिहेरी लढत होण्याचे संकेत आहेत. महिला, तरुण तसेच नवमतदारांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला. मेळघाटच्या पाच गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने तेथे मतदान झाले नाही. तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. एकूण १,९८३ मतदानकेंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडले

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तर बुलडाणा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.६६ टक्के मतदान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com