Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : वन विभागातील मंडळे ‘प्रभारी’वरच

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्य सरकारने वन विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आठ वर्षांपासून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळांची स्थापन केली.

या महत्त्वाकांक्षी मंडळांच्या कार्यालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मात्र आता प्रभारीवरच असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे मंडळे स्थापनेचा उपयोगच काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पर्यटन क्षेत्रातील आर्थिक संधी, रोजगार निर्मितीची क्षमता, वनांमध्ये वस्ती असलेल्या आदिवासींचा उदरनिर्वाह आणि निसर्ग शिक्षणाच्या संतुलित अंमलबजावणीसाठी ‘महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ’ स्थापन केले. राज्यातील वन, वन्यजीव व वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन व नियोजन करण्याचे काम केले जाते.

इतकेच नव्हे तर निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व भागीदारांच्या संबंधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येणार होता. मात्र, पाच वर्षांपासून या विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांचे पदच रिक्त आहे. या पदाची प्रभारी जबाबदारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांच्यावर अनेक वर्षांपासून आहे.

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण २०१५ मध्ये स्थापन झाले. राज्यातील सर्व प्राणी संग्रहालयाच्या कामासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण सदस्य सचिव हे पदही निर्माण करण्यात आले. आता मात्र, हे पदही प्रभारीच आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रभारी क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याकडे पदभार आहे. २००२ साली जैवविविधता कायदा आला. २०१२ मध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ स्थापन झाले. राज्यातल्या जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि त्यासाठी शहरी व ग्रामीण भागात समिती स्थापन करण्याची जबाबदारी या मंडळावर सोपवण्यात आली.

त्यानुसार या मंडळाने राज्यात २८ हजार ६४९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना केली. मात्र, या मंडळाचे सदस्य सचिव हे पदही तब्बल दोन वर्षांपासून प्रभारीवरच आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक ( उत्पादन व नियोजन) एम. श्रीनिवास राव यांच्याकडे या मंडळाचे सदस्य सचिव तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बांबू महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदाचा प्रभार दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT